थिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षणशेतीवाडी
Trending

रब्बी ज्वारीची पेरणी फायदेशीर

पेरणीची पंचसुत्री पध्दत व सुधारित वाण

Spread the love

रब्बी ज्वारी हे एक महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्याचा वापर धान्य, कडबा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टिने रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे दिवसें दिवस रब्बी ज्वारीची मागणी वाढत चालली आहे. रब्बी ज्वारीच्या आधुनिक जातींमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत. की, ते जुन्या पारंपरिक जातीमध्ये नव्हते.

थिंक टँक / डॉ.नाना हालंगडे
महाराष्ट्राची शेती ही मोठया प्रमाणावर पर्जन्यधारीत असून ओलीताच्या सोयी फारच कमी आहेत. चालू शतकातील कृषि क्षेत्राची सर्वात महत्त्वाची तांत्रिक घटना म्हणजे तृणधान्य पिकांच्या अधिक उत्पादन देणा-या जातींचा विकास होय, अधिक उत्पादन म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ, ग्राहकांना स्वस्त धान्याचा पुरवठा होय अधिक व दर्जेदार शेती उत्पादन वाढीमध्ये बियाण्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असून शेतकऱ्यांना संकरीत, अधिक उत्पन्न देणारे सुधारीत दर्जेदार बियाणे रास्तदराने पुरेशा प्रमाणात वेळेवर उपलब्ध असणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.असे असले तरी सांगोला तालुक्यातही रब्बी ज्वारीची पेरणी ही मोठ्या प्रमाणात होत असून,अनेकांनी पेरणीही केलेली आहे.

रब्बी ज्वारी हे एक महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्याचा वापर धान्य, कडबा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टिने रोजच्या जेवणात ज्वारीच्या भाकरीचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे दिवसें दिवस रब्बी ज्वारीची मागणी वाढत चालली आहे. रब्बी ज्वारीच्या आधुनिक जातींमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत. की, ते जुन्या पारंपरिक जातीमध्ये नव्हते.

१) अधिक धान्य आणि कडबा उत्पादन क्षमता
२) पीक पक्वतेचा कमी काळ.
३) किड व रोगांची प्रतिकारक क्षमता.
४) अवर्षण प्रतिकारक क्षमता.

महाराष्ट्रात रब्बी ज्वारी ही ३ प्रकारच्या जमिनीवर घेतली जाते.
(१ ) हलकी. (२ ) मध्यम (३ ) भारी.
_रब्बी ज्वारी ही वरील तिन्ही प्रकारच्या जमिनीवर अनुक्रमे २३, ४८ व २९ टक्के इतक्या क्षेत्रावर कोरडवाहूखाली घेतली जाते, रब्बी ज्वारीच्या यशस्वी लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, वाण, सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे रब्बी ज्वारीची उत्पादनक्षमता ही इतर पिकांच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून येते. गेल्या वर्षाची (२०२० – २१) सरासरी उत्पादकता ही १०४५ किलो / हेक्टर इतकी आहे._

उत्पादकतेस कमी कारणीभूत असलेल्या विविध कारणांपैकी खालील बाबींचा अंतर्भाव मुख्यत्वे आढळतो
रब्बी ज्वारीची लागवड प्रामुख्याने विविध प्रकारच्या जमिनीवर केली जाते. (हलकी, मध्यम, भारी )

  • खरीप हंगामात साठविलेल्या ओल्याव्यावरच लागवड केली जाते.
  • कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर कोणत्याही वाणांची लागवड केली जाते.
  • कोणत्याही वाणांची ओलीताखाली लागवड केली जाते. कारण काही ठराविक वाण हे ओलीतास प्रतिसाद देतात. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते.

महाराष्ट्र राज्याची रब्बी ज्वारीची सध्याची उत्पादकता ही जरी समाधानकारक वाढली असल्याचे दिसून येते. तरी पण आपणांस ही उत्पादकता १७०० किलो/ हेक्टर करण्याची क्षमता आपल्या संशोधित वाणात आहे कारण या संशोधन केंद्राने वेगवेगळया जमिनीच्या प्रकारानुसार वाणांचे संशोधन केले आहे. त्यांची उत्पादकता ही हलक्या जमिनीवर ८००-१००० किलो / हेक्टर, मध्यम जमिनीवर २००० – २५०० किलो / हेक्टर, भारी जमिनीवर २५००-३००० किलो / हेक्टर तर बागायती खाली ३०००-३५०० किलो / हेक्टर इतकी आढळून आली. सध्याची उत्पादकता वाढावयाची असेल तर आपणांस कोरडवाहू खाली रब्बी ज्वारीसाठी पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक धान्य व कडबा उत्पादन मिळण्यास शेतकऱ्यांना निश्चित मदत होईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी खालीलप्रमाणे पंचसुत्रींचा अवलंब करावा.

दीक्षाभूमीला गिळंकृत कोण करतंय?

  • रब्बी ज्वारीसाठी पंचसुत्री

पंचसुत्री वापरामुळे रब्बी ज्वारीच्या उत्पादनात १०० टक्के वाढ होते. त्यापैकी मुलस्थानी पाणी व्यवस्थापनामुळे ३०%, सुधारीत वाणांचा जमिनीच्या प्रकारानुसार वापरामुळे २५%, पेरणीनंतरचे ओलावा व्यवस्थापनामुळे २०%, अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे १५% आणि पीक संरक्षणामुळे १०% इतकी ज्वारी उत्पादनात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचसुत्रीचा काटेकोर वापर करावा.

सोने म्हणून आपट्याचीच पाने का?

*मुलस्थानी पाणी व्यवस्थापन :
_महाराष्ट्रातील रब्बी ज्वारीचे उत्पादन कमी असण्याची काही प्रमुख कारणे म्हणजे हे पीक मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू भागात खरीप हंगामात पडणा-या पावसाच्या जमिनीतील साठविलेल्या ओलाव्यावर घेतले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हे पीक वेगवेगळया प्रकारच्या जमिनीवर (२३% हलकी जमीन, ४८% मध्यम जमीन, २९% भारी जमीन) सर्वसाधारणपणे ५.५-८.५ सामु असणाऱ्या जमिनीत ज्वारी घेता येते. रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी जमिनीची मशागत पेरणीपूर्वी करावी. ज्वारी पेरणीपूर्वी जमिनीची नांगरट केल्यास जमिनीत पाणी मुरण्यास मदत होते त्याकरीता नांगरट, कुळवाच्या पाळ्या इत्यादी मशागतीची कामे उतारास आडवी करावी पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीची बांधणी करावी.

दसरा मेळाव्यात शहाजीबापूंची तोफ धडाडणार

त्यासाठी १० x १२ चौमी. आकाराचे वाफे तयार करावेत. सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकल्यास कमी खर्चात वाफे तयार करता येतात किंवा २.७० मीटर अंतरावर सारा यंत्राने सारे पाडून दर २० मीटरवर बळीराम नांगराच्या सहाय्याने दंड टाकावेत. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, ही कामे जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात करावीत. त्यामुळे १५ जुलै ते १५ सप्टेंबर या काळातील पाणी जमिनीत मुरविले जाते व त्याचा उपयोग ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होतो. पेरणी ही तिफणीने दोन चाड्याच्या पाभरीने करावी. दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी, २ रोपातील अंतर १५ से.मी. इतके ठेवावे.

सावधान! डेंग्यूचा ताप पसरतोय

पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे, अनुवंशिकतेनुसार ज्वारीचे शुध्द बियाणे वापरावे. संकरित ज्वारीचे बियाणे फक्त मोहोरबंद पिशवीतील प्रमाणित बियाणे वापरावे, योग्यवेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो त्यामुळे रब्बी ज्वारीची पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. मुलस्थानी पाणी व्यवस्थापनामुळे उत्पादनात ३०% वाढ झाल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे.

जमिनीच्या प्रकारानुसार जातीच्या वापर :
_महात्मा फुले कृषि विद्यापीठाने महाराष्ट्रातील रब्बी ज्वारी पिकविणा-या निरनिराळया भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. या तंत्रामुळे उत्पादनात २५% वाढ होते असे आढळून आले आहे.

सुधारीत जाती
(अ ) हलकी जमीन : फुले अनुराधा :
अवर्षण प्रवण भागात हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य, पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस असून अधिक अवर्षणास प्रतिकारक्षम आहे. या वाणाची भाकरीची आणि कडब्याची प्रत उत्कृष्ट आहे, या वाणाचे कोरडवाहूमध्ये धान्य उत्पादन सरासरी प्रती हेक्टरी ८ ते १० क्विंटल व कडबा ३० ते ३५ क्विंटल प्रति हेक्टरी मिळते.

हॉट व्हिडिओ बनविणे आले अंगलट लेडी कंडक्टरला केले निलंबित
(ब ) मध्यम जमीन : फुले सुचित्रा
या वाणाची अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली आहे. या जातीस पक्व होण्यास १२० ते १२५ दिवसाचा कालावधी लागतो. या वाणाचे दाणे मोत्यासारखे शुभ्र आहेत. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे, या वाणाचे सरासरी धान्य उत्पादन २४ ते २८ क्विंटल तर कडबा उत्पादन ६० ते ६५ क्विंटल कोरडवाहूमध्ये मिळते. हा वाण अवर्षणास, खडखडया, पानांवरील रोगास, खोडमाशी व खोडकिडीस प्रतिकारक्षम आहे.

(क ) भारी जमीन : फुले वसुधा
ही जात भारी जमिनीकरीता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस केलेली असून या जातीस ११६ ते १२० दिवस पक्व होण्यास लागतात. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार असतात. भाकरीची व कडब्याची प्रत उत्तम आहे, ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी २५-२८ क्विंटल तर बागायतीसाठी ३०-३५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते तर कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये ५५-६० क्विंटल तर बागायतीमध्ये ६०-६५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

तुमच्या घरातील हे चॅनल्स होणार बंद

बागायती क्षेत्र
फुले रेवती : ही जात भारी जमिनीकरीता बागायतीसाठी विकसीत करण्यात आली आहे. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे, चमकदार असतात. भाकरीची चव उत्तम आहे व कडबा अधिक पौष्टीक व पाचक आहे. ही जात ११८ ते १२० दिवसात तयार होते, या जातीचे धान्य उत्पादन बागायतीसाठी ४० ते ४५ क्विंटल प्रति हेक्टर मिळते. तर कडब्याचे उत्पादन ९० ते १०० क्विंटल प्रति हेक्टर मिळते. ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक

ज्वारीच्या इतर उपयोगांकरीता वाण
(अ) फुले मधुर : ही जात ज्वारीच्या हुरड्यासाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे. या जातीचा हुरडा ९५ ते १०० दिवसात तयार होतो. या जातीचे हुरडा उत्पादन ३०-३५ क्विंटल प्रति हेक्टर व कडब्याचे उत्पादन ६५-७० क्विंटल प्रति हेक्टर मिळते. हुरडा चवीला उत्कष्ट असुन खोडमाशी, खोडकिडा, खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे.

रवीश, तू जीवंतपणीच इतिहास झालाय!

(ब) फुले पंचमी : ही जात ज्वारीच्या लाह्यांसाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे. ही जात ११५ ते १२० दिवसात तयार होते. या जातीपासून पांढ-या शुभ्र, पुर्ण फुललेल्या लाह्या तयार होतात. या वाणामध्ये गटाण्याचे प्रमाण अत्यल्प असून लाह्या तयार होण्याचे प्रमाण ८७.४ टक्के इतके आहे. या वाणापासून धान्य उत्पादन १२-१४ क्विंटल प्रति हेक्टर मिळते तर कडब्याचे उत्पादन ४०-४५ क्विंटल हेक्टर मिळते. ही जात खोडमाशी व खडखडया रोगास प्रतिकारक्षम आहे.

(क) फुले रोहीणी :
ही जात ज्वारीच्या पापडांसाठी मध्यम ते भारी जमिनीकरीता विकसीत करण्यात आली आहे. ही जात ११५ ते १२० दिवसात तयार होते. पापडाचा रंग लालसर विटकरी असून खाण्यासाठी कुरकुरीत व चवदार आहे, खोडमाशी, खोडकिडा व मावा या किडीस तसेच खडखड्या रोगास प्रतिकारक्षम असून पाण्याचा ताण सहन करते, या वाणापासून धान्य उत्पादन १८-२० क्विंटल प्रति हेक्टर मिळते. तर कडब्याचे उत्पादन ४५ ते ५० क्विंटल प्रति हेक्टर मिळते, हा वाण पश्चिम महाराष्ट्राकरिता पापडासाठी शिफारस केला आहे.

नांगरणी नंतरचे ओलावा व्यवस्थापन
पिकाच्या सुरवातीच्या ३५-४० दिवसात तण व पिकामध्ये अन्नद्रव्य जमिनीतून शोषणसाठी तीव्र स्पर्धा असते. त्यामुळे सुरुवातीस ३५ ते ४० दिवसात पीक तणविरहित ठेवणे महत्वाचे आहे. पेरणी नंतरच्या ओलावा व्यवस्थापनामध्ये १८ इंच पाभरीने पेरणी करुन ४५ x १५ सेमी अंतर राखणे तसेच पेरणी नंतर १०-१५ दिवसांनी विरळणी करुन एका ठिकाणी एकच ठोंब ठेवावा. पहिली कोळपणी पेरणी नंतर ३ आठवड्यांनी फटीच्या कोळप्याने करावी.

या कोळपणीमुळे तणांचा बंदोबस्त होऊन मातीचा थर जमिनीवर तयार होऊन मातीचे आच्छादन तयार होते. दुसरी कोळपणी पेरणीनंतर ५ आठवड्यांनी करावी त्यामुळे रोपांना मातीचा आधार मिळतो. पीक ८ आठवड्यांचे झाल्यानंतर दातेरी कोळप्याने तिसरी कोळपणी कोळप्याला दोरी बांधून करावी, त्यामुळे जमिनीच्या भेगा बुजण्यास मदत होऊन पिकांच्या मुळांना मातीची भर दिली जाईल व शेतात स-या पडल्यामुळे पावसाचे पाणी धरुन ठेवण्यास मदत होईल. या कोळपणीमुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन न होता जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

पेरणी नंतर आवश्यकतेनुसार १-२ वेळा निंदणी करावी. कोरडवाहु ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजुक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे. बागायती ज्वारीमध्ये तिसरे पाणी पीक फुलोऱ्यात असतांना पेरणीनंतर ७०-७५ दिवसांनी आणी कणसांत दाणे भरतांना पेरणीनंतर ९०-९५ दिवसांनी द्यावे. पेरणी नंतरचे ओलावा व्यवस्थापनामुळे उत्पादनात २० टक्के भरीव वाढ होते असे प्रयोगांती सिध्द झाले आहे.

अन्नद्रव्य व्यवस्थापन :
(अ) जिवाणू खतांचा वापर :
रब्बी ज्वारीस १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोस्पिरिलम किंवा पी.एस.बी. या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. या खतांपासून १५-२० टक्के उत्पादन वाढते. अशी प्रयोगाअंती आढळून आले आहे. जिवाणू खतांची पाकिटे जिल्हा परिषद, कृषि खाते, कृषि विद्यापीठे, कृषि महाविद्यालये, कृषि सेवा केंद्रे यांच्याकडे उपलब्ध असतात.

*(ब ) रासायनिक खतांचा वापर :
रबी ज्वारीच्या संकरीत व सुधारित जाती नत्र खतास चांगला प्रतिसाद देतात. कोरडवाहु ज्वारीस प्रति १ किलो दिल्यास १० ते १५ किलो धान्य उत्पन्न वाढत असल्याचे प्रयोगाअंती आढळून आले आहे.
जमिनीच्या प्रकारानुसार खालीलप्रमाणे रासायनिक खतांची शिफारस केलेली आहे.

*(अ ) कोरडवाहू जमीन : खताचे हेक्टरी प्रमाण (किलो)

*(१ )जमिनीचा प्रकार : हलकी जमिन
नत्र : २५ किलो
स्फुरद : नाही
पालाश : किलो

*(२ )जमिनीचा प्रकार : मध्यम जमिन
नत्र : ४० किलो
स्फुरद : २० किलो
पालाश : नाही

*(३ )जमिनीचा प्रकार : भारी जमिन
नत्र : ६० किलो
स्फुरद : ३० किलो
पालाश : नाही

(ब ) बागायती जमीन : खताचे हेक्टरी प्रमाण (किलो)*

जमिनीचा प्रकार : हलकी जमिन
नत्र नाही
स्फुरद नाही, पालाश : नाही

*जमिनीचा प्रकार : मध्यम जमिन

नत्र : ८० किलो
स्फुरद : ४० किलो
पालाश : ५० किलो

*जमिनीचा प्रकार : भारी जमिन
नत्र १०० किलो
स्फुरद : ५० किलो
पालाश
५० किलो
नत्र दोन हप्त्यात (पेरणीवेळी अर्धे व पेरणीनंतर एक महिन्याने अर्धे) संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणी वेळेस द्यावे. कोरडवाहू जमिनीस संपूर्ण नत्र पेरणीवेळेस द्यावे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये रासायनिक खते पेरणीच्या वेळी दिल्यास उत्पादनात १५ टक्के वाढ होते.

*पीक संरक्षण
*(अ ) खोडमाशी : या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस ३५ टक्के प्रवाही ३५० मि.ली. २५० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी उगवणीनंतर ७ ते ८ दिवसांनी फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. त्यासाठी ३५ इ.सी. क्विनॉलफॉस ७०० मि.ली. ५०० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारावे.
*(ब ) खोडकिडा :* या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर क्विनॉलफॉस ३५ इ.सी. १०७५ मि.ली., ७५० लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. पहिली फवारणी उगवणीनंतर ३० दिवसांनी करावी.

*रोग नियंत्रण
*(अ ) काणी : दाणे काणी व मोकळी काणी हे दोन बुरशीजन्य रोग आहेत. या रोगांचा प्रसार ज्वारीच्या बियाण्याद्वारे होतो. या रोगांच्या नियंत्रणासाठी खालील उपाय योजना करावी.
या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे होत असल्याने बियाणे रोगमुक्त शेतामधुन निवडावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ३०० पोताच्या गंधकाची ४ ग्रॅम किंवा ३ ग्रॅम थायरमची प्रति १ किलो प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.
मळणीपूर्वी काणीग्रस्त कणसे काढून नष्ट करावीत म्हणजे पुढे रोगाचा प्रसार होणार नाही.
*(ब ) खडखड्या : हा बुरशीजन्य रोग आहे या बुरशीचा शिरकाव जमिनीतून ज्वारीच्या ताटात होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मुळाजवळच्या ताटाचा बुंधा नरम पडतो. कालांतराने अशी झाडे कोलमडून जमिनीवर लोळतात.
*नियंत्रण : जमिनीत कमी ओलावा असल्यास या रोगाची लागण मोठया प्रमाणात आढळून येते. म्हणून पाणी देण्याची सोय असल्यास शिफारशीप्रमाणे पिकाला पाणी द्यावे. पेरणीपूर्वी शेतात शेणखत घालावे. कोळपण्या करुन जमिनीत ओलावा टिकवून ठेवावा असमतोल खताची मात्रा देवू नये. शिफारशीपेक्षा नत्र जास्त आणि पाणी कमी दिल्यास रोगाचे प्रमाण वाढते. कोरडवाहूमध्ये पीक ३ ते ४ आठवड्यांचे झाल्यावर हेक्टरी ५ टन तुरकाट्याचे आच्छादन केल्यास रोगाचे प्रमाण कमी होते आणि ताटे लोळण्याचे प्रमाणही कमी होते.

प्रयोगांती असे दिसून आले आहे की आच्छादनामुळे ताटे जमिनीवर पडण्याचे प्रमाण ४२ टक्के कमी होवून धान्य उत्पादनात १४ टक्के वाढ होते. पीक संरक्षणामुळे उत्पादनात १० टक्के वाढ होते असे प्रयोगाअंती सिध्द झाले आहे.

*ज्वारीची काढणी : ज्वारीचे पीक जातीपरत्वे ११० ते १३० दिवसांत काढणीस तयार होते. ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास प्रथम फुटताना टच आवाज येतो आणि ज्वारी पिठाळ लागते. त्याप्रमाणे ज्वारीचे बारकाईने निरीक्षण केल्यास दाण्याच्या टोकाकडील भागाजवळ काळा ठिपका आढळून येतो. ही लक्षणे दिसताच ज्वारीची काढणी करावी. ज्वारी काढणीनंतर ८ ते १० दिवस कणसे उन्हात वाळवून झाल्यानंतर मळणी करावी.

धान्य उफणणी करुन तयार झाल्यानंतर त्याला पुन्हा साठवणुकीपूर्वी उन्हात वाळवावे. सर्वसाधारणपणे ५० किलोची पोती भरुन ठेवल्यास पुढे बाजारपेठेत विक्री करणे सोपे जाते.

*उत्पादन : अशाप्रकारे रब्बी ज्वारी सुधारीत तंत्राप्रमाणे आणि जमिनीच्या प्रकारानुसार लागवड केल्यास रब्बी ज्वारीपासून हलक्या जमिनीवर ८ ते १० क्विंटल, मध्यम जमिनीवर २०-२५ क्विंटल, भारी जमिनीव २५-३० क्विंटल तर बागायतीखाली ३०-३५ क्विंटल धान्याचे प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. कडब्या बाबत हलक्या जमिनीवर ३ ते ३.५ टन, मध्यम जमिनीवर ५-६ टन, भारी जमिनीवर ६-७ टन बागायतीखाली ८-९ टन प्रति हेक्टरी कडब्याचे उत्पादन मिळू शकते.
(स्त्रोत : इंटरनेट)

“Think Tank Live” आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, कू आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.

https://www.facebook.com/thinktanklive

https://youtube.com/channel/UC63eW251e_NSYvXT2EY1G-A

https://www.instagram.com/invites/contact/?i=vnzxtoi6ba0k&utm_content=1w7jshq

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका