१२ वर्षीय मुलीच्या वागण्यावरुन शंका आली कुटुंब हादरलं
थिंक टँक : नाना हालंगडे
जळगावमधील यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचारातून मुलाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करणाराही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील एका गावात १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दोन भाऊ, बहिण आणि आईवडिलांसह वास्तव्याला आहे. आई-वडील आणि भाऊ हे हातमजूरी करून उदरनिर्वाह करतात. वर्षभरापासून अल्पवयीन मुलीने शाळेत जाणं बंद केलं होतं. त्यामुळे ती घरीच राहत होती. एक अल्पवयीन मुलगा मुलीला काहीतरी आमिष दाखवत गेल्या वर्षभरापासून तिच्यावर अत्याचार करत होता. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी ही गर्भवती राहिली.
दिड महिन्यापूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमात मुलीच्या चालण्या बोलण्यावरून तिच्या आईवडीलांना संशय आला. अधिक चौकशी केली तसंच तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार तिला शुक्रवारी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी पिडीत अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिला. याप्रकरणी मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आरोग्य विभाग राबवणार राज्यव्यापी ‘बालआरोग्य तपासणी मोहीम’
- “नेत्यावर बंदूक रोखण्यासारखं काही नसलं की बायकोच्या मागे लागतात” : अमृता फडणवीस
- “आपल्या समाजात आधीपासून LGBTQ समूह” : मोहन भागवतांचं मोठं विधान
- अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन : ‘आधारस्तंभ’?
- दारु पिवू नका, आरोग्य जपा : अजित पवारांचा सल्ला
- एसटी बस उजनी धरणात पडता पडता वाचली