ताजे अपडेटथिंक टँक स्पेशल
Trending

हॉट व्हिडिओ बनविणे आले अंगलट लेडी कंडक्टरला केले निलंबित

Spread the love

गिरी ह्या कळंब आगारामध्ये कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. त्यांच्या या व्हिडिओंना सोशल मीडियावर खुप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.

थिंक टँक / नाना हालंगडे
एसटी महामंडळात उस्मानाबाद आगारात लेडी कंडक्टर असलेली एक महिला विविध भावमुद्रेत हॉट व्हिडिओ बनवत होती. वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत असे. या व्हिडिओंना सोशल मीडियावर खूप लाईक्स आणि कमेंट मिळत असत. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स देखील आहेत. मात्र, एसटी महामंडळाला या महिलेचे कलागुण पाहवले नाहीत. तिचे थेट निलंबन करण्यात आले.

एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने महिला कंडक्टरला मोठा धक्का बसला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील मंगल सागर गिरी (Mangal Sagar Giri) या लेडी कंडक्टरला (Lady Conductor) ऑन ड्यूटी असता स्वतःचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणे महागात पडल आहे.

गिरी ह्या कळंब आगारामध्ये कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. त्यांच्या या व्हिडिओंना सोशल मीडियावर खुप लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.

हॉट अंदाजात व्हिडिओ
एसटी महामंडळाचा (ST Corporation) ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा गिरी यांनी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा त्यांचा व्हिडिओ तुफान गाजला होता. या व्हिडिओवर एसटी महामंडळाने आक्षेप घेतला.

सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख

 

व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची  प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले. याबतचे वृत्त झी चोवीस तासने दिले आहे.

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका