हा तर खोक्यांचा चमत्कार : खा. संजय राऊत
धनुष्यबाणाच्या निर्णयावर सडकून टीका
थिंक टँक / नाना हालंगडे
शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे . “खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला आहे हे आज स्पष्ट झालं आहे. श्री रामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळत असेल तर सत्यमेव जयते हे ब्रिदवाक्य तोडून असत्यमेव जयते करावं लागेल” असा घणाघात संजय राऊत यांनी निवडणूक आयोग व मिंधे गटावर केला आहे. ”
खा. संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “हे अपेक्षित होतं . ज्या पद्धतीने सरकार बनवलं, ज्या पद्धतीनं खोक्यांचा वारेमाप वापर झालाय. हा खोक्यांचाच विजय झालाय. खरेदी-विक्री कुठपर्यंत गेली आहे हे आज स्पष्ट झालं. श्री रामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळत असेल तर सत्यमेव जयते ब्रिदवाक्य तोडून असत्यमेव जयते करावं लागेल. जो पक्ष हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी, लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष 40 बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहिल. आज निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेनं गमावला” , अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत यांचे ट्विट
निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले.
चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक आयोग त्यास मान्यता देते.ही पटकथा आधीच लिहून तयार होती.
देश हुकूशाहीकडे निघाला आहे. निकाल आमच्या बाजूनेच लागेल असे गद्दार सांगत होतेच.खोके चमत्कार झाला! लढत राहू.— Sanjay Raut (@rautsanjay61) February 17, 2023
खासदार संजय राऊत म्हणाले की, “या देशातल्या सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचं सुरू आहे. त्यातलंच हे महत्त्वाचं पाऊल. न्यायलय असेल , तपास यंत्रणा असेल , निवडणूक आयोग असेल कुणाच्या तरी गुलाम असल्या सारख्या वागत आहेत. जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी, लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला . तो पक्ष 40 बाजारबुणगे विकत घेतात . याची नोंद इतिहासात राहील. आज निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेनं गमावला ” , अशा शब्दात संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला फटकारले .
दबावाखाली झालं
खा. राऊत म्हणाले की, “हे सगळं दबावाखाली झालेलं आहे. महाराष्ट्रावर सूड घेण्यासाठी झालेलं आहे. मुंबईवर शिवसेनेचा मराठी माणसाचा अधिकार राहू नये यासाठी फेकलेला हा फास आहे. माझा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. याचा त्यांना काहीही फायदा झाला तरी हे लोकं सर्वोच्च न्यायालय व जनतेला विकत नाही घेऊ शकत नाही ” असे संजय राऊत यांनी सांगितले.