हात धुतल्याने २५ टक्के आजार कमी होतात : ना. गुलाबराव पाटील
स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत मोबाईल अॅपच्या लोगोचे अनावरण
सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
हात धुणे किती महत्त्वाचे आहे हे कोरोना काळात आपण अनुभवले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते २५ टक्के आजार हे हात धुतल्यावर कमी होतात. कोरोना कमी झाला असला तरी लहान मुलांचे हात स्वच्छ धुवून आजारापासून दूर रहा, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. १५ आॅक्टोबरला हात धुवा दिवस साजरा करा असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर येथे स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत मोबाईल अॅपच्या लोगोचे अनावरण ना.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर विमानतळावर प्रारंभी मंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वागत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. या प्रसंगी खाजगी सचिव अशोक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) स्मिता पाटील, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, विशेष कार्यकारी अधिकारी डाॅ.गणेश बडे, कार्यकारी अभियंता दिपक कोळी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, नगरसेवक गुरूशांत धत्तुरगावकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता माशाळे आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ अंतर्गत मोबाईल अॅपवर स्वच्छतेसाठी प्रतिसाद द्या.लहान मुलांसह वृध्दांनी देखील हात स्वच्छ धुतला पाहिजे. मुलांना लहान वयात हात धुणेची चांगली सवय लावूया, असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०२१ मोबाईल अॅपच्या लोगोचे अनावरण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून पाळला जातो, कोरोनाने दाखवून दिलंय स्वच्छतेला किती महत्व आहे हे. मंत्रालयापासून ते सीईओ कार्यालयापर्यंत वडीलधाऱ्यांपासून ते लहान बालकांपर्यंत हात स्वच्छ धुण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मेडिकल सांगण्यानुसार २५ टक्के आजार हे हात धुतल्यावर कमी होतात, त्यामुळे सर्वाना आवाहन आहे की, कोरोना कमी झाला असला तरी लहान मुलांचे हात स्वच्छ धुवून आजारापासून दूर रहा, आपला देश, आपले राज्य, आपला जिल्हा व गाव स्वच्छ राहण्यासाठी या मोहिमेत हिरीरीने सहभाग नोंदवा, असे आवाहन केले.
- राजकारणी खरे नटसम्राट : पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील
- यंदाचा दसरा आहे विशेष; 3 शुभयोग एकाच मुहूर्तावर
- जागतिक हात धुवा मोहीम राबवा
- कोरोना पार्श्वभूमीवर कलाकार व संस्थांना अथसहाय्य देणार
सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी एक लाख विद्यार्थीसाठी हात धुणेचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करून एक चांगला उपक्रम आयोजित केले बद्दल अभिनंदन केले. प्रारंभी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षमधील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
हात धुवा प्रात्यक्षिकांमध्ये एक लाख विद्यार्थी सहभागी होणार – सीईओ दिलीप स्वामी
सोलापूर जिल्हयात १५ आॅक्टोबर निमित्त जागतिक हात धुवा दिनानिमित्त एक लाख विद्यार्थी सहभागी होणार असून आॅनलाईनद्वारे हात धुणेचे प्रात्यक्षिके करून दाखविले जाणार आहे.सकाळी १० ते ११ या वेळेत विद्यार्थी या मध्ये सहभागी होणार आहेत.सोलापूर जिल्हा स्वच्छतेत आग्रही राहिल.स्वच्छ सुंदर शाळा हा उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविला आहे.
——–