हंगिरगे मुरूम चोरी प्रकरण; दोन महिन्यांपूर्वी ठोठावला होता 1 कोटी 43 लाखाचा दंड
लोकप्रतिनिधींनी केली होती मध्यस्थी
राजकीय वरदहस्तामुळे हा ठेकेदार तक्रारदाराला जुमानत नव्हता. पण तक्रारदाराने ही हार न मानता ही तक्रार कोर्टात दाखल केली होती. अखेर कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सांगोला/ नाना हालंगडे : सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील अवैध मुरूम चोरी प्रकरणी सांगोला न्यायालयाने गुन्हे दाखल करा म्हणून आदेश काढल्यानंतर नुकतेच सांगोला पोलिसात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मात्र यापूर्वीच सी पी बागल कंपनी गादेगाव यांना दंड ठोठावण्यात आला होता. यामध्ये लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्याने त्यांनी हा दंड भरला नव्हता. अखेर कोर्टाने आदेश दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची हकीगत अशी की, वर्षभरापूर्वी या मुरुमाची बेकायदेशीर रित्या चोरी करण्यात आली होती.
प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी निर्णय दिला होता. पण राजकीय वरदहस्तामुळे हा ठेकेदार तक्रारदाराला जुमानत नव्हता. पण तक्रारदाराने ही हार न मानता ही तक्रार कोर्टात दाखल केली होती. अखेर कोर्टाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मौजे हंगिरगे येथे गट नं. २३३/१ येथे विनापरवाना मुरुम उत्खनन करण्यात आले होते. याबाबत जवळा मंडळ अधिकारी यांनी तेथील उत्खननाचा पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला होता. त्या नुसार तहसीलदार तहसीलदार यांनी सी पी बागल कंपनी यांना १ कोटी ४३ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
मात्र तरीही ठेकेदार हा जुमानत नव्हता. याबाबत न्यायालयात अपील करण्यात आले. त्यानुसार न्यायालयाने ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.