स्वातीताईंनी रचला विकासकामांचा डोंगर
जवळा जि. प. गटाच्या माजी सदस्या स्वातीताई कांबळेंची यशोगाथा
आजचा रंग : निळा
सांगोला : नाना हालंगडे विविध पदांची जबाबदारी स्वातीताई कांबळे यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रवास प्रेरणादायी असाच आहे. ही नवदुर्गा, रणरागिणी थोर अशी समाजसेविका आहे. त्यांचे बंधू गणेश कांबळे यांच्या समाजसेवेची अजोड जोड त्यांना लाभलेली आहे. त्या वाकी-घेरडी गावच्या कन्या आहेत व कडलासच्या सुनबाई आहेत. त्यांचे वडील, सासरे, भाऊ दीर्घकाळापासून राजकारणात सक्रीय आहेत. घरातील बुजूर्ग मंडळींचेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यासोबत सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी वाकी-घेरडीसह जवळा जि.प. गटात समाजकार्य करण्याची सुरुवात केली. मा. आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी जि.प. अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. स्वातीताई कांबळे यांचे कार्य अचंबित करण्यासारखेच आहे. त्यांनी पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली व त्यात त्या विजयी झाल्या. घटस्थापना-नवरात्रोत्सव शेतीचा शोध लावणाऱ्या महामातांचा सन्मान! जवळा जि.प. गटाच्या विकासाबरोबरच सांगोला तालुक्यातही मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवून त्यांनी आपली वेगळी ओळख करुन दिली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती, वॉलकंपाऊंड, पाणी पुरवठा, अंगणवाडी दुरुस्ती व नवीन इमारत बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारत बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र दुरुस्ती व बांधकाम, दलित वस्ती सुधार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, 3054, 5054 अंतर्गत डांबरीकरण रस्ते, तिर्थक्षेत्र, जनसुविधा, नागरी सुविधा, नालाखोलीकरण- रुंदीकरण, नवीन बंधारे, कोविड 19 मध्ये जिल्ह्यात भरीव निधीसाठी योगदान, वृक्षलागवड, महिला बचत गटांना प्रोत्साहन, कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेली निधी मागणी याबाबत सक्रिय पाठपुरावा, वाकी-घेरडी येथे नवीन मिनी अंगणवाडी अनेक वर्षापासून प्रलंबीत होती. त्याचा पाठपुरावा करुन त्यास मान्यता, तालुक्यातील अनेक नॉन प्लॅन रस्ते प्लॅनमध्ये समावेश करुन घेतले.
स्वातीताई कांबळेंनी तालुक्यातील काही देवस्थानात तिर्थ क्षेत्र “क” दर्जात समावेश केला. अंगणवाडी सेविका, मदतनिस, प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी यांच्या अनेक मागण्याबाबत सक्रीय पाठपुरावा केला. अनेक केंद्र व राज्य सरकारकडील सर्व योजनांचा सक्रीय पाठपुरावा करुन अनेक वैयक्तिक लाभ मिळवून दिले. जिल्हा परिषदेच्या सर्व सभा, कार्यक्रमांना 100% उपस्थितीत राहून अनेक प्रलंबीत प्रश्न निकाली काढले. स्मार्ट अंगणवाडी साठी योगदान, हंगामी कर्मचारी कायम करण्यासाठी योगदान. अशा ग्रामपंचायतीसह विविध विभागात त्या अव्वलस्थानी राहिल्या.
पाहा खास व्हिडिओ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते घडले. त्यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीयाही आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे श्रीमती स्वातीताई कांबळे. स्वातीताई कांबळे ह्या जवळा जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्या आहेत.
स्वातीताई कांबळे यांच्यावर विविध पदांची जबाबदारी आहे. त्यांनी माजी सदस्या जिल्हा परिषद सोलापूर जवळा गट, सदस्या शिक्षण समिती जिल्हा परिषद सोलापूर, सदस्या आरोग्य समिती जिल्हा परिषद सोलापूर, सदस्या जिल्हा नियोजन समिती जिल्हा परिषद सोलापूर, सिनेट सदस्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, प्रवक्ता महिला राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा, सल्लागार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र राज्य अशा विविध पदांवर काम केले आहे..