सोलापूर विभागात पुन्हा 44 कर्मचाऱ्यांच्या बदल्या
एसटी महामंडळाचे "बदलीअस्त्र"
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
एसटी कामगार संघटनांचे आंदोलन चिरडण्याचा जोरदार प्रयत्न होताना दिसत आहे. आवाहनाला कर्मचारी जुमानत नसल्याने निलंबनासोबतच आता एसटी महामंडळाने “बदलीअस्त्र” उगारले आहे. सोमवारी सोलापूर विभागातील विविध आगारातील तब्बल 44 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी 51 जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
सांगोला आगारातील आणखी चौघांच्या बदल्या
सांगोल्यासह राज्यातील एसटी कामगार कामबंद आंदोलनावर ठाम असून राज्य शासनाने निलंबनासह बदल्यांच्या सपाटा लावलेला आहे.
त्याच अनुषंगाने आज पुन्हा सांगोला आगारातील 4 तर जिल्ह्यातील 44 जणांच्या बदल्या केलेल्या आहेत. यापूर्वी शनिवारी सांगोल्यातील 25 जणांचे निलंबन करण्यात आले होते.
पाच जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. सोमवारपासून सांगोला आगार सुरू करण्यात आले. सोलापूर, जत व आटपाडी या तीन मार्गांवर गाड्या सुरू करण्यात आल्या.सोमवारी सोलापूर विभागातील विविध आगारातील तब्बल 44 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी 51 जणांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.