सोलापूर विभागातील 51 एस.टी. कर्मचाऱ्यांच्या बदल्या
सांगोला एसटी आगारातील 5 कर्मचाऱ्यांचा समावेश, 25 जणांचे निलंबन
सांगोला / नाना हालंगडे
विविध मागण्यांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या एस. टी. कामगारांच्या आंदोलनाला संपवण्याचा जोरदार प्रयत्न एसटी महामंडळ व राज्य सरकारकडून होताना दिसत आहे. सोलापूर विभागातील तब्बल 51 एस.टी. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री उशीरा हा आदेश काढण्यात आला. या बदल्यांमध्ये सांगोल्यातील 5 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारीच सांगोला आगारातील 25 जणांचे निलंबन करण्यात आले होते.
कृती समितीच्या आदेशाने 28 ऑक्टोबरपासून दोन दिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. त्यानंतर माघार घेतल्याने 4 नोव्हेंबरपासून राज्यभर विलिनीकरणासाठी हा संप करण्यात आला. पण राज्यभरातील 45 कर्मचाऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे 45 दिवसाचा दुखवठा म्हणून कामबंद आंदोलन सुरू असून, त्यामुळे प्रशासनाने सोलापूर विभागातील 51 जणांच्या बदल्याया, सांगोला आगारातील 25 जणांचे निलंबन व 5 जणांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
राज्य शासनाने पगारवाढ करून कामबंद आंदोलन मागे घेण्यास सांगितले आहे. पण कामगार आपले 45 सहकारी गेल्याने दुःखवठा म्हणून 45 दिवस कामावर नाहीत. प्रशासनाने मात्र राज्यभर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अशातच सोलापूर विभागातही कारवाई सुरू आहे. काल रात्रीपर्यंत 51 जणांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या तर सांगोला आगारातील 25 जणांचे निलंबन अन् 5 जणांच्या बदल्या करण्यात आलेला आहेत. या कामबंद आंदोलनास आत्ता 34 दिवस झाले असून,11 दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे.
राज्य सरकारने आम्हाला अत्यावश्यक सेवेत सामावून घेतले नाही. त्यामुळे आमच्यावर मेस्मा कायदा लागू होत नाही. आम्ही दुखवटा पाळत आहोत. सरकारने आमच्या मागण्यांचा तातडीने विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. (एक निलंबित कर्मचारी)