सोलापूर विद्यापीठाकडून ‘हिंदी साहित्या’वर 12 डिसेंबरला संवाद कार्यक्रमाचे आयोजन
प्रसिद्ध कवयित्री व चित्रकार निर्मला सिंह यांच्याशी संवाद
सोलापूर, दि.7- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भाषा संकुलातील हिंदी विभागामार्फत दि. 12 डिसेंबर 2020 रोजी सकाळी साडेअकरा वाजता ‘सृजनरंग: काव्य एवं चित्रो के संग’ या विषयावर दिल्लीच्या प्रसिद्ध कवयित्री व चित्रकार निर्मला सिंह यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाषा व वांग्मय संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली.
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात हिंदी साहित्य-संस्कृतीमधील काव्य आणि चित्रासंदर्भात डॉ निर्मला सिंह या मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर त्यांची यावेळी प्रकट मुलाखत होणार आहे. हिंदी साहित्य क्षेत्रातील विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम ऑनलाईन होणार असून https://forms.gle/UfaorzQPBG3s4aku6 कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी या लिंकवरून नाव नोंदणी करावे. https://youtu.be/ZxcBrNiX8cM या युट्युब लिंकवरून हिंदी साहित्यप्रेमींना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. डॉ अनंत वडघणे -8554006708, प्रा. ममता बोल्ली – 9422744006 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.