गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

सोलापूर राष्ट्रवादीचा आमदार हनी ट्रॅपच्या जाळ्यात

महाराष्ट्रात खळबळ, अश्लील व्हिडिओ बनविले

Spread the love

आमदार माने हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पुण्यातील सायबर पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांक तपासून तो राजस्थानमधील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर या जिल्ह्यांत ७ दिवसांसाठी तळ ठोकून एकाला अटक केली आहे

थिंक टँक / नाना हालंगडे
सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक आमदार सेक्स टॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आलीय. यशवंत माने असे त्या आमदाराचे नाव आहे. माने हे मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी धाडस दाखवत या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी राजस्थान येथून एकाजणास अटक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर या जिल्ह्यांत ७ दिवसांसाठी तळ ठोकून एकाला अटक केली आहे.

रिझवान खान (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील आहे. आरोपी खान याने आत्तापर्यंत ८० जणांना असे फोन केले आहेत. हे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून आत्तापर्यंत ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात खळबळ, अश्लील व्हिडिओ बनविले
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार (MLA) यशवंत माने (Yashwant Mane) यांना sextortion च्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जानेवारी २०२३ मध्ये आमदार माने यांच्या मोबाईल क्रमांकावर एक अश्लील मेसेज आला. अश्लील व्हिडिओ कॉल करून त्यांना भूरळ पाडण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच, व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी त्यांना देऊन एक लाख रुपयांची खंडणी मागितली. (NCP MLA Yashwant Mane from Solapur in the trap of sextortion; One arrested from Rajasthan)

आरोपीने माने यांच्याकडे खंडणीची मागणी केली, 1 लाख रुपयांची खंडणी त्याने मागितली. जर खंडणी दिली नाही तर अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर माने यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुणे सायबर पोलिसांनी आपली सुत्रे हलवत आरोपीच्या परराज्यात असताना मुसक्या आवळल्या. आमदार माने यांना सेक्सटोर्शनच्या जाळ्यात ओढणाऱ्या आरोपीचं नाव रिझवान अस्लम खान असं आहे.

मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार
माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सायबर चोरट्यांनी आमदार माने यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडिया वरुन मिळवला. त्यांना अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना भूरळ पडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राजस्थान येथून आरोपी ताब्यात
माने हे पुण्यात वास्तव्यास असून त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पुण्यातील सायबर पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांक तपासून तो राजस्थानमधील असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पथक पाठवले. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी राजस्थानमधील भरतपूर या जिल्ह्यांत ७ दिवसांसाठी तळ ठोकून एकाला अटक केली आहे

रिझवान खान (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थानमधील आहे. आरोपी खान याने आत्तापर्यंत ८० जणांना असे फोन केले आहेत. हे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून त्याच्याकडून आत्तापर्यंत ४ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. आरोपीला अटक करुन पुण्यात आणल्यानंतर आमदार माने आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासोबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

मी कुणीशीही बोललो नाही : यशवंत माने

दरम्यान,‘मी कुठल्या ही व्यक्तीशी बोललो नाही. तसेच मला लागोपाठ ७०-८० मेसेज करण्यात आले होते. एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती, त्यामुळे मी ही तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली होती, असे आमदार यशवंत माने यांनी म्हटलं आहे.

सेक्सटॉर्शनसारख्या प्रकरणांंमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसत आहे. अशातच राज्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला सेक्सटोर्शनमध्ये जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

सेक्सटॉर्शन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध लोकांची फसवणूक झाल्याची अनेक प्रकरण समोरल आली आहेत. डिजीटल युगामध्ये सर्वांनी अशा गोष्टींपासून सतर्क राहण्याची गरज आहे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका