सोलापूर महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
#कामाची बातमी
सोलापूर : कोरोना महामारीच्या काळात बहुतेक ठिकाणी नोकरभरती थंडावलेली आहे. (Covid-19) बेरोजगार युवक हताश होताना दिसत आहेत. अशातच सोलापूर महानगरपालिकेत (Solapur Mahapalika Recruitment 2021) विविध पदांसाठी लवकरच भरती होणार आहे.
सोलापूर महापालिकेकडून (Solapur Mahapalika) याबाबतची जाहिरात (Corporation Advertisement) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- हेही वाचा : तिसऱ्या लाटेचा धोका, बेड कधीही ताब्यात घेणार : पुणे महापालिकेचे खासगी रुग्णालयांना पत्र
- महाराष्ट्राचे राजकारण तिसऱ्या लाटेवर स्वार
- सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार शेतकऱ्यांची कृषीपंप थकबाकी माफ
प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ, सामाजिक विकास विशेषज्ञ, नगर नियोजन तज्ज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2021 आहे.
- प्रकल्प/अभियांत्रिकी विशेषज्ञ (Project /Engineering Specialist)
- सामाजिक विकास विशेषज्ञ (Social Development Specialist)
- नगर नियोजन तज्ञ (Town Planning Specialist)
- पात्रता आणि अनुभव
- प्रकल्प /अभियांत्रिकी विशेषज्ञ (Project /Engineering Specialist) – BVSC आणि MVSC पदवी आवश्यक.
- सामाजिक विकास विशेषज्ञ (Social Development Specialist) – BVSC आणि MVSC पदवी आवश्यक.
- नगर नियोजन तज्ञ (Town Planning Specialist) – BVSC आणि MVSC पदवी आवश्यक
या पत्त्यावर पाठवा अर्ज
सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर-413001
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2021
अधिक माहितीसाठी खालील जाहिरातीत दिलेली वेबसाईट पाहावी.