सोलापूर झेडपीत लाच घेताना आणखी एक अधिकारी ताब्यात

सलग दुसऱ्या दिवशी एसीबीची कारवाई

Spread the love
  • सोलापूर झेडपीत लाच घेताना आणखी एक अधिकारी ताब्यात
  • सलग दुसऱ्या दिवशी एसीबीची कारवाई

सोलापूर : एच. नाना

जिल्हा परिषदेत सलग दुसऱ्या दिवशी एक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आला. कालच स्वामी नावाच्या एका लाचखोराला अटक करण्यात आली होती. ही कारवाई पूर्ण होते न होते तोच आज पुन्हा कनिष्ठ प्रशासन अधिकारी लाच घेताना सापडला. सुहास चेळेकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदारास पती – पत्नी एकत्रीकरण योजनेतून जवळच्या रिक्त शाळेत मुख्याध्यापक पदी बदली हवी होती. या कामासाठी चेळेकर यांनी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १५ हजार रुपये घेताना त्याला अटक करण्यात आली.

जिल्हा परिषदेत सलग दुसऱ्या दिवशी एक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आला. कालच स्वामी नावाच्या एका लाचखोराला अटक करण्यात आली होती. ही कारवाई पूर्ण होते न होते तोच आज पुन्हा कनिष्ठ प्रशासन अधिकारी लाच घेताना सापडला. सुहास चेळेकर असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.

(बातमी अपडेट होत आहे)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका