थिंक टँक / नाना हालंगडे
मागील दोन दिवसांपूर्वीच सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना 25 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच जिल्हा परिषद आवारातच असलेल्या कोषागार ऑफिसमध्ये एका महिलेने लाच घेण्याचे धाडस केले आणि ती लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद अडकली.
सरकारी कार्यालयांमध्ये लाच घेण्याची वाईट प्रवृत्ती किती खोल रुजली आहे, अधिकारी किती निर्भयपणे लाच स्वीकारतात हेच या घटनेवरून दिसून येते.
पेन्शनच्या प्रकरणावरून जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला कनिष्ठ लिपिक बडवणे यांनी लाच मागितली होती. तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी सायंकाळी जिल्हा कोषागार कार्यालयात सापळा लावला होता. लाच स्वीकारताना महिला कर्मचारी बडवणे यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
तक्रारदाराचे वडिल पोलिस खात्यात होते आणि काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता . सरकारी नियमानुसार त्यांच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन मिळते आणि त्यासाठी तक्रारदार ट्रेझरी शाखेत हेलपाटे मारत होते . फाईल पुढे सरकविण्यासाठी तेथील महिला लिपीक अश्विनी बडवणे ( वय ३४ ) यांनी लाच मागितली .
त्यांना साडेचार हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काहीवेळापूर्वी रंगेहाथ पकडले . प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या लाचेचे प्रकरण ताजे असतानाच त्या महिला लिपीकाने आज ( बुधवारी ) घेतली . विशेष म्हणजे मंगळवारी तक्रारदाराने त्या लिपीक महिलेला दीड हजार रुपये दिले होते .
तरीसुध्दा तेवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही . त्यांनी आज पुन्हा साडेचार हजारांची मागणी केली . हेलपाटे मारून वैतागलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत विभागात धाव घेतली . त्यानंतर सापळा रचून त्या महिला लिपीकेला रंगेहाथ पकडले . त्यांच्यावरील पुढील कारवाई सुरु आहे.
तक्रारदाराचे वडिल पोलिस खात्यात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन सुरू करण्यासाठी त्यांचा ट्रेझरीत प्रस्ताव होता. फाईल पुढे पाठविण्यासाठी महिला लिपिकाने मंगळवारी दीड हजार रुपये लाच घेतली.
दीड हजार घेऊनही पुन्हा बुधवारी साडेचार हजार रुपये मागितले होते. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात धाव घेऊन तक्रार दिली होती. नुतन पोलिस उपअधीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.