ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षण
Trending

सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार मुलांना लागले चष्मे

शाळांच्या तपासणीत हादरवणारे सत्य

Spread the love

सोलापूर जिल्ह्यातील शाळांची नुकतीच मुलांच्या डोळ्यांची तपासणी झाली. यामध्ये 4 हजार 105 मुलांना चष्मा लागला आहे. यामध्ये 3 लाख 47 हजार 430 मुलांची तपासणी झाली. यामध्ये 6 हजार मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून आला. त्यामुळे मुलांना मोबाईल आणि संगणक वापरण्यास देण्यावर पालकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

स्पेशल रिपोर्ट / डॉ.नाना हालंगडे
मोबाईलचा अतिवापर लहान मुलांचे मोठे नुकसान करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील असेच एक भयानक सत्य पुढे आले आहे. आली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाद्वारे तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण विभागामार्फत “चला मुलांनो उजेडाकडे” या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी 6 हजार मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून आला. 4 हजार 105 मुलांना चष्मा लागला आहे. याच दरम्यान 75 मुलांच्या डोळ्यावर शत्रक्रियाही करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर जिल्ह्यातील शाळांची नुकतीच मुलांच्या डोळ्यांची तपासणी झाली. यामध्ये 4 हजार 105 मुलांना चष्मा लागला आहे. यामध्ये 3 लाख 47 हजार 430 मुलांची तपासणी झाली. यामध्ये 6 हजार मुलांमध्ये दृष्टीदोष आढळून आला. त्यामुळे मुलांना मोबाईल आणि संगणक वापरण्यास देण्यावर पालकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाद्वारे तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण विभागामार्फत “चला मुलांनो उजेडाकडे” ही मोहीम जिल्ह्यात नुकतीच राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रे,14 ग्रामीण रुग्णालये व 3 उपजिल्हा रुग्णालये स्तरावर मुलांची दृशिदोष तपासणी करण्यात आली आहे. अजूनही ही मोहीम सुरूच आहे.

याच दरम्यान 75 मुलांच्या डोळ्यावर शत्रक्रिया ही करण्यात आली.

दरमहा डोळ्यांची तपासणी झालेल्या दृष्टीदोष मुलांची यादी राज्यस्तरावर पाठविली जात आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी आदेश दिले आहेत.

यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, डॉ.शितलकुमार जाधव, डॉ.सोनिया बगाडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. ही सर्व विदारक स्थिती असून 3 ते 5 वर्षाच्या सर्वच मुलांना दृष्टीदोष पहावयास मिळत आहे. त्यामुळे सर्वच पालकांनी सजग राहणे,उचित ठरणार आहे.

तुमचा मोबाईल तुम्हाला संपवतो आहे
ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण थोडा वेळ काढून नक्की वाचाच.
आठवा पाहू किती दिवस झाले तुम्ही किमान २४ तास मोबाईल पासून दूर राहून? एक दिवस मोबाईल पूर्णपणे बंद केला तर काहीही बिघडत नाही, यावर तुमचा विश्वास आहे का? आपण स्वतःही मोबाईल वापरतो आणि आपल्या मुलांनाही देतो. म्हणजे त्यांचे नुकसान करतो.

घड्याळ, कॅल्क्युलेटर, पासबुक, डायरी, टिव्ही सगळं मोबाईलने हिरावून घेतलंय. आपली मुलंसुद्धा हिरावून घेतली आहेत. जी पप्पा, मम्मी मोबाईलमध्ये डोकावून बसतात तेव्हा केविलवाणे होऊन आपल्याकडे काहीतरी सांगत असतात, आणि आपण ते नीटसं ऐकूनही घेत नसतो. त्यांच्या ही हातात एखाद टॅब किंवा स्मार्टफोन दिलेला असतो

जेव्हापासून आपण स्मार्ट फोन घेतला तेव्हापासून आपण स्मार्ट झालोत की मूर्ख होत आहोत?

कोणतीही ॲप बनवणारी कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कसं गुंतवून ठेवता येईल यावर यशस्वी होत असते, त्यांचं अर्थकारण यावर चालत असतं. आपण कामासाठी कितीवेळ मोबाईल वापरतो आणि टाईमपास म्हणून किती वेळ वापरतो?

एका नोटिफिकेशनने आपला किती वेळ घालवला हे तुम्हाला कधी लक्षात आलं आहे का? असं कितीवेळा झालं आहे की आपल्याला एक काम करायचं होतं मोबाईलवर आणि नेमकं तेवढं काम सोडून आपण अर्धा तास चाळतच बसलेलो राहिलो.

सकाळी सकाळी उठल्यावर कितीजण मोबाईलला हात न लावता आपली पहाटेची कामे पूर्ण करतात? आपल्याला व्यसन लागलं आहे मोबाईलचे हे आपण मान्य करत नाही आहोत. आपल्या आयुष्यातला कितीतरी मौल्यवान वेळ आपण काहीतरी उपयुक्त, अर्थपूर्ण करायला घालवू इच्छिता का?

आपली स्वप्न, इच्छा, आकांक्षा यांची पूर्तता करू इच्छिता का? तर चला मग माझ्या सोबत आपण आपल्या आयुष्याचे नियंत्रण परत स्वतःकडे घेऊया

काय करता येईल?
डायरी आणि पेन विकत घ्या. (मोबाईल मध्ये कितीही उपलब्ध असले तरीही एवढं कराच)
कामांची यादी, प्लॅनची यादी, मनातल्या स्वप्नांची यादी (बकेट लिस्ट) बनवा.

मोबाईलची Notification बंद करा. काहीही तुमच्या आयुष्या एवढं महत्त्वाचं नसतं, तुम्ही मोबाईलसाठी नाही, मोबाईल तुमच्यासाठी आहे.

किमान २-४ असे ॲप नक्कीच आहेत ज्याची तुम्हाला गरज नाही, त्याला उडवा. शुभेच्छा द्यायच्या आहेत ना, शब्दात लिहून पाठवा, शक्य असेल तर एक मिनिटांचा कॉल किंवा टेक्स्ट मेसेज करा.

छोटी छोटी उद्दिष्ट पूर्ण करा. उदा. पुस्तकाचे किमान एक पान रोज वाचा. किमान चार ओळी वहीवर लिहा. आपला एक छंद जोपासा याप्रमाणे एक छोटी गोष्ट पूर्ण करा.

सुट्टीच्या दिवशी काही तासांसाठी स्विच ऑफ करून ठेवा.
रात्र झाली तर इंटरनेट बंद करून ठेवा, स्क्रीन उलटी करून ठेवा. कितीही हात शिवशिवले तरीही तरी रात्रीच्या एका विशिष्ट वेळा नंतर मोबाईल हातात घेऊ नका.

मनोरंजन केवळ मोबाईल मध्येच आहे का?
घरात कुटुंबातील सदस्यांशी बोलणे, टीव्ही वर एकत्रित काही कार्यक्रम बघणे, फिरायला बाहेर पडणे, आवडीचे काम करणे यातही मनोरंजन आहेच ना? मोबाईल मधले मनोरंजन आभासी आहे, त्यामुळे ते वास्तविक मनोरंजन न देता आभासी मनोरंजन देत असतं.

मोबाईल आणि कामे आज बहुतांशी कामे ऑनलाईन झाली, कोरोनामुळे हे अवलंबित्व अधिकच प्रमाणात वाढलं. सतत नव्याने येणारी कामे किंवा सूचना यामुळे आपल्याला खूपवेळा मोबाईलचा सतत चाळा लागलेला असतो. याला पूर्णपणे थांबवणं शक्य नसलं तरी प्रत्येक पाच पाच मिनिटाला काहीतरी महत्त्वाचं येत नसतं हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे ही अस्वस्थता प्रयत्नपूर्वक टाळली पाहिजे.

मोबाईलबाबत काही शिष्टाचार
◆ समोर एखादी व्यक्ती किंवा मित्र, नातेवाईक बसलेला असताना किमान आपण मोबाईलमध्ये कॉल, मेसेज किंवा गेम खेळत बसणे हे कमालीचे अपमानकारक असते त्याला इग्नोर केल्याची भावना त्यातून निर्माण होते. त्यामुळे हातात मोबाईल घेऊ नका, किंवा Excuse me असे म्हणून किंवा तशी कल्पना देऊन अगदी थोडक्यात आपलं काम करून मोबाईल बाजूला ठेवावा.

जेवण करताना मोबाईल बघत जेवण्याने चव ही कळत नाही, आणि तोंडात पुरेशी लाळ ही बनत नाही.
मोबाईलची स्क्रीन सगळ्यात जास्त जंतूनी भरलेली असते, त्यामुळे खाताना स्क्रीनला हात नकोच, वेळोवेळी स्वच्छ कपड्याने Sanitise करून घेतली पाहिजे.

कौटुंबिक बैठकीत, मीटिंग किंवा महत्वाच्या कामात सायलेंट करून ठेवणे. कॉल आलाच तर शक्य झाल्यास मेसेज करून तसे कळवणे. अगदीच नाईलाज असेल तर किमान बाहेर पडून थोडक्यात बोलून परत येणे.

खूपवेळा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकत असता, पण डोकं मोबाईलमध्ये खुपसून असता, डोळ्यांचा एकमेकांशी संपर्क नसल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते.

शेवटी काय तर मोबाईल हा जगण्याचा भाग आहे, जीवन नाही. आपल्याला मिळालेलं आयुष्य आणि त्यातला वेळ फार मोजकाच आहे. त्याला आपण सो कॉल्ड स्मार्ट फोनला उगाच दान नाही ना करू शकत, बघा करा विचार. यातून वाचलेला वेळ कसा सत्कारणी लावता येईल बघुया.


हेही वाचा

शेकापच्या ४५ सरपंचांचा शहाजीबापूंवर संताप, कामात खोडा घालत असल्याचा आरोप

15 वर्षांपेक्षा जुनी वाहने हद्दपार?

विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य

कुत्ता गोळीच्या नशेत तरुणाई झिंगाट!

“उर्फी के अंडरवेअर मे छेद है.. चित्राताई ग्रेट है”

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका