सोलापूर जिल्हा माहिती अधिकारीपदी सुनील सोनटक्के रुजू
सोलापूर : सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सुनील सोनटक्के यांनी आज घेतला. श्री. सोनटक्के यांच्याकडे कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाचाही पदभार आहे.
यावेळी माहिती सहायक धोंडिराम अर्जुन, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वाघमोडे यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
श्री. सोनटक्के यांनी यापूर्वी जळगाव माहिती अधिकारी, हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी, लातूर जिल्हा माहिती अधिकारी, लातूर उपसंचालक पदाचा अतिरिक्त पदभार यशस्वीपणे सांभाळला आहे. मागील विधानसभेच्या निवडणूक कालावधीत श्री. सोनटक्के यांनी दिड महिना सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी पदाचा पदभार सांभाळला आहे.
- हेही वाचा : ‘वंचित’ला आणखी एक धक्का, प्रदेश महासचिवाचा भाजपात प्रवेश
- आमदार निलेश लंके यांच्यावर येतोय मराठी चित्रपट
- सांगोला साखर कारखान्याच्या निवडणुकीत मटण, पैसे दिले, 57 लाख खर्च केले