सोलापूरात माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या तोंडाला काळे फासले

आ. प्रणिती शिंदे यांच्यासमोरच भर कार्यक्रमात राडा

Spread the love

सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या अंगावर व तोंडावर काळे फेकल्याची घटना सोलापूर येथे भर सभेत घडली. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासमोरच हा प्रकार घडला.

मार्डी येथील यमाई देवी आश्रम शाळेमधील संचालक अशोक लांबतुरे आणि सुरेखा लांबतुरे यांनी केलेला भ्रष्टाचार चर्मकार समाजातील प्रमुख तथा आश्रम शाळेमधील संचालक मयत भानुदास शिंदे यांनी बाहेर काढला होता. त्याचा राग मनात धरून अशोक लांबतुरे आणि त्यांच्या पत्नी हे त्यांना वारंवार मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून भानुदास शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी शासकीय विश्रामगृहात आत्महत्या केली होती, असे आंदोलनकर्त्याचे मत आहे. या घटनेनंतर चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिंदे कुटुंबीयांना विश्वासात घेत न्याय देतो अशी ग्वाही देऊन अशोक लांबतुरे आणि त्यांच्या पत्नी यांना संघटनेतून काढून टाकले होते.

जोपर्यंत शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांना संघटनेत घेणार नाही असा शब्द दिला होता. तो शब्द खोटा ठरवत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबाला फसवून त्यांना संघटनेत पुन्हा घेऊन सोलापुरात कार्यक्रम करण्यासाठी आलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांना मयत भानुदास शिंदे यांच्या कुटुंबीयांनी निषेध केला तर त्यांचे चिरंजीव धनु शिंदे यांनी स्टेजवर त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या नावे जाहीर निषेधाच्या घोषणा दिल्या.

यावेळी स्टेजवर आमदार प्रणिती शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नगरसेविका संगीता जाधव आणि समाजातील प्रतिष्ठित व्यासपीठावर उपस्थित होते. शिंदे कुटुंबीय आपल्या वडिलांच्या मारेकर्‍यांना तुम्ही पाठीशी का घालत आहेत असे म्हणत आपला रोष सभागृहांमध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सर्व समाजासमोर व्यक्त केला.

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मयत भानुदास शिंदे यांच्या मारेकर्‍यांना पाठीशी घालत सोलापुरात आज कार्यक्रम घेतला, तर शिंदे कुटुंबीयांनी त्यांच्या तोंडाला काळे फासून जाहीर निषेध केला. याही पुढे जर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर माजी मंत्री घोलप यांचे कपडे फाडू असा इशारा देखील शिंदे यांचे चिरंजीव धनु शिंदे व इतर पिडीत कुटुंबीयांनी दिला. या घटनेमुळे काही काळ तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका