सोलापूरात मराठा आरक्षण मोर्चात विराट गर्दी

पोलिसांच्या नाकाबंदीला भेदत तरुण सहभागी

Spread the love

 

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी निघालेला सोलापूरातील मोर्चा अखेर यशस्वी झाला. माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. या मोर्चात खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. विजयकुमार देशमुख, माजी आ. नरसय्या आडम आदी नेते सहभागी होते. माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. समाधान आवताडे यांना महामार्गावरच अडवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे वेशांतर करून पोलिसांना चकवा देत सोलापूरात दाखल झाले होते.

या मोर्चावेळी आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, धैर्यशील मोहीते-पाटील, शहाजी पवार, मनिष देशमुख, इंद्रजित पवार, इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्यासह असंख्य नेते उपस्थित होते.

दुपारी एकच्या सुमारास मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चाचं पहिले टोक छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर शेवटचे टोक छत्रपती संभाजी महाराज चौकात होते. मोर्चाला गालबोट लागू नये यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तरुणाईचा आक्रोश
तळपत्या उन्हात युवक आणि महिला आंदोलक सहभागी झाले होते. यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांची नाकाबंदी
शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणारा रस्ता बॅरिकॅटीग टाकून बंद करण्यात आला होता. नाक्यांवर तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे वेशांतर करून पोलिसांना चकवा देत सोलापूरात दाखल झाले होते. त्यांच्या या गनिमी काव्याची चर्चा होत होती.

(ताजे अपडेट हे पेज रिफ्रेश करून पाहात राहा.)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका