सोलापूरात भूकंपाचे धक्के, नागरिकांत भिती

भूकंपमापन यंत्रणेचा मात्र कोणताही दुजोरा नाही

Spread the love

सोलापूर : सोलापूर शहरात शनिवारी रात्री ११.४७ ते १२ वाजण्याच्या दरम्यान भूकंपाचे (Erathquake) धक्के बसल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे. याबाबतची बातमी आॅनलाईन वृत्तपत्रावरून देण्यात आलीय. या वृत्ताला अधिकृत भूकंपमापन यंत्रणेने मात्र कोणताही दुजोरा दिला नाही.

सोलापूरात भुकंपाचीच चर्चा
सोलापूर शहरवासीय गूढ आवाज अन् इमारतीला कंपन जाणवल्याने घराबाहेर पडले. दरम्यान भूकंप ३.८ रिश्चर स्केल असल्याचेही बोलले जात आहे.

विजयपूरसह कर्नाटकातही धक्के
सोलापूरसह कर्नाटकातील सिंदगी, विजयपूर, बसवणबागेवाडी या शहरांत भूकंपाचे धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.

सात रस्ता परिसरातील कृष्णा अपार्टमेंटमधील प्रमोद शास्त्री यांनी सांगितले की, आम्ही घरात झोपलो असताना आमची इमारत अचानक हादरायला लागली. साधारण चार मिनिटे ही कंपने जाणवली. लगेचच आम्ही घरातील सर्व मंडळी गॅलरीत आलो याशिवाय भवानीपेठ परिसरातील अनेक लोक भूकंपाचा धक्का बसल्याने रस्त्यावर आल्याचे दिसून आले. केले.

भूकंपाची वेळ रात्री 11 वाजून 57 मिनिटांची होती, तीव्रता सुमारे 4 एवढी असल्याचे वृत्त आहे, किमान 10 किलोमीटर अंतरावर 4 ची तीव्रता होती असे दाखवण्यात आले आहे.
विजयपूरसह भूकंपाचे धक्के हे कर्नाटकातील इंडी, अफजलपूर, सिंदगी, सोलापूर, पंढरपूर या भागात बसल्याचे वृत्त आहे. याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळाला नाही. रात्री उशिरा धक्के बसल्याने आता रविवारी दिवसभर याची माहिती घेतली जाईल, कुठे काही पडझड झाल्याचे वृत्त नाही.


सोलापूर शहरासह पंढरपूर परिसरात शनिवारी रात्री 11:57 च्या सुमारास भूकंप झाल्याची चर्चा होत आहे. भूकंपाची तीव्रता सोलापुरात जाणवली नाही मात्र सात रस्ता परिसरातील कृष्णा अपार्टमेंटमध्ये अनेकांना हा भूकंप जाणवल्याचे समजते. भूकंपाचा केंद्रबिंदू हे कर्नाटक राज्यातील विजयपूर हे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर याची माहिती नाही मात्र राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत ट्विटर वेबसाईटवर कोल्हापूरमध्ये भूकंप झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे त्यांची तीव्रता ही 3.9 होती.
(ही बातमी अपडेट होत आहे…)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका