सोलापूरात आजपासून कडक जमावबंदी
पोलिस आयुक्त हरीश बैजल यांचे आदेश
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
सोलापूर शहरात पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी कडक जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. त्यांनी रविवारी रात्री उशिरा हे आदेश काढत शहर हद्दीत सोमवार 22 रोजी रात्री 1 वाजल्यापासून ते मंगळवार 23 नोव्हेंबर 2021 च्या रात्री 12 पर्यंत कडक जमावबंदी लागू केली आहे.
या आदेशानुसार जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेला आहे. शहरात कोणतेही मोर्च, धरणे, मिरवणुका/ रैली निदर्शने यासारखे आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यास मनाई करण्यात येत आहे.
त्रिपुरा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीत कलम ३७(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये दि. १५/११/२०२९ रोजी ००.०९ रोजीपासून ते दि. २९/११/२०२१ रोजीचे २४.०० वा. पर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेला आहे. सर्वानी सदर आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. राजकीय पक्ष, विविध संघटनांनी इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून अफवा अगर सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट, संदेश, ऑडीओ, व्हीडीओ क्लीप प्रसारित करू नये, असे आदेशात नमूद केले आहे.
आदेश खालीलप्रमाणे