सोलापुरात मुंगसापासून बनविले हजारो ब्रश, दोघे विक्रेते ताब्यात
सोलापूर वनविभागाची धाडसी कारवाई
धाडीमध्ये मॉर्डन स्टेशनरी शॉप येथील मयुर रमेश बाकळे, वय- ३० वर्षे, रा. १६२/७, रेल्वे लाईन, सोलापूर यांच्या दुकानामध्ये मुंगुस या दुर्मिळ प्रजातीचे केसापासून बनविलेले पेंटिग मुंगुस हेअर ब्रश एकूण संख्या ४७९ नग आणि अनिल धन्यकुमार शहा, वय- ६७ वर्षे, रा. इंद्रधनु, समर्थ नगर, उत्तर सदर बझार, सोलापूर यांचे मालकीचे अनिल एजन्सी शॉपी या दुकानामधून मुंगुस या वन्यप्राण्याच्या केसापासून बनविलेले क्राऊन कंपनीने एकूण २२५० ब्रश जप्त करण्यात आलेले आहेत.
थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
सोलापूर वनविभागाने टाकलेल्या धाडीमध्ये मुंगसाच्या केसापासून बनविण्यात आलेले हजारो ब्रश सापडले. वनविभागाच्या पथकाने सायंकाळी दोन स्टेशनरी विक्रेत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो (W.C.C.B.) यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे सोलापूर वनविभाग, सोलापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत वनविभागाच्या पथकाने सायंकाळी दोन स्टेशनरी विक्रेते यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर प्रकरणी केलेल्या धाडीमध्ये मॉर्डन स्टेशनरी शॉप येथील मयुर रमेश बाकळे, वय- ३० वर्षे, रा. १६२/७, रेल्वे लाईन, सोलापूर यांच्या दुकानामध्ये मुंगुस या दुर्मिळ प्रजातीचे केसापासून बनविलेले पेंटिग मुंगुस हेअर ब्रश एकूण संख्या ४७९ नग आणि अनिल धन्यकुमार शहा, वय- ६७ वर्षे, रा. इंद्रधनु, समर्थ नगर, उत्तर सदर बझार, सोलापूर यांचे मालकीचे अनिल एजन्सी शॉपी या दुकानामधून मुंगुस या वन्यप्राण्याच्या केसापासून बनविलेले क्राऊन कंपनीने एकूण २२५० ब्रश जप्त करण्यात आलेले आहेत.
या प्रकरणांमध्ये वरील आरोपी विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2(16), 2(36), 39 R/W, 44(A) (B) 50, आणि 51 (1) अन्वये सोलापूर वनपरिक्षेत्रांतर्गत प्रा.व.गु.WLP-8(327076), दिनांक 06.01.2022 आणि प्रा.व.गु.WLP-8(327077), दिनांक ०६.०१.२०२२ हे अनुक्रमे मयुर बाकळे आणि निलम शहा यांचेविरुध्द दाखल करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी उपरोक्त आरोपीस शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृह सोलापूर येथे करण्यात आलेली आहे.
सदर प्रकरणी जप्त करण्यात आलेली ब्रश हे मुंगुस या प्राण्याच्या केसापासून बनविण्यात आलेले असून मुंगुस या प्राणीचा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे अन्वये अधिसूची भाग-II मध्ये समावेश आहे. मुंगुस हेअर ब्रश तयार करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
१ किलो मुंगुस हेअर ब्रश तयार करण्याकरिता साधारणत: ५० मुंगुसची शिकार केली जाते, त्यामुळे मुंगुस हेअर ब्रश वापरणे व त्याकरिता मुंगुस प्राण्याची शिकार करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत प्रतिबंधीत कृत्य आहे.
सदर प्रकरणीमध्ये धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग सोलापूर आणि एल.ए.आवारे, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) सोलापूर यांचे मार्गदर्शनामध्ये डी.पी.खलाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोलापूर, शंकर कुताटे, वनपाल, शशिकांत सावंत, वनपाल, श्रीशैल पाटील, वनरक्षक, बापूराव भोई व गंगाधर विभूते, वनरक्षक यांनी केली. सदर प्रकरणाचा अधिक तपास श्री. डी.पी.खलाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोलापूर हे करीत आहेत.