सोलापुरात माकपने जाळली 25 हजार विजबिले

अंधारकडे नेणाऱ्या महावितरणचा कुटील डाव हाणून पाडा : कॉ.आडम मास्तर

Spread the love

 

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) महावितरणकडून वाढीव बिले येत असल्याचा निषेध करीत सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे सुमारे २५ हजार विजबिलांची होळी करण्यात आली. माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

यावेळी आडम मास्तर म्हणाले की,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील उद्योजकांना दर 1 युनिटला 2 रुपये 76 पैसे वीजबिलाची आकारणी तर सर्वसामान्यांना दर 1 युनिटला 7 रुपये वीजबिल आकारणी केली जाते. या उद्योजकांसाठी राज्य सरकार कडून स्वतःच्या तिजोरीवर ओझे टाकून 800 कोटी रुपये अनुदानपोटी महावितरण कंपनीला अदा केली जाते. ही तफावत महाराष्ट्राला आर्थिक विषमतेकडे नेत आहे. महावितरण कंपनी पुन्हा श्रमिकांना प्रकाशातून अंधाराकडे नेऊ पाहत आहे तरीही सरकारला याची जाग का ? येत नाही याहून अधिक दुर्दैव दुसरे असूच शकत नाही.हा हेतुपुरस्सर रचलेला डाव आहे. अर्थव्यवस्थेला 68 हजार कोटी रुपयांची अर्थातच अब्जावधी रुपयांची टोपी घालून विजय माल्या, निरव मोदी, मेहुल चोकशी देशाला बुडवून पळून गेले. अशांचे बँकेतील कर्ज सरकार माफ करते मात्र अन्नपाणी,आरोग्य आणि रोजीरोटी साठी तडफडणाऱ्या श्रमिकांना मात्र सरकार फुटकी कवडी देण्याचे औदार्य दाखवायला तयार नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनचा अयशस्वी प्रयोग केला. देशातील सर्व हातावर पोट असणारे श्रमिक, उद्योजक, व्यापारी, शेतकरी, छोटे मोठे दुकानदार हे पूर्णतः हतबल झाले. लॉकडाऊन मध्ये लोक भुकेकंगाल झाले,  अशी टीका आडम यांनी केली.

यावेळी नसीमा शेख,नलिनी कलबुर्गी, सिद्धपा कलशेट्टी व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर, सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू, माशप्प विटे,  म.हानिफ सातखेड आदींनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक सिटू चे राज्य महासचिव अँड एम एच शेख यांनी केले तर अनिल वास यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानले.

सदर धरणे आंदोलन यशस्वी होण्यासाठी रंगप्पा मरेड्डी, सलीम मुल्ला, सलीम पटेल, दीपक निकंबे,सिद्धाराम उमराणी, बापू साबळे, फातिमा बेग, शकुंतला पानिभाते, दाऊद शेख, नरेश दुगाणे, विक्रम कलबुर्गी,अशोक बल्ला, दत्ता चव्हाण, आरिफ मणियार जावेद सगरी मोहन कोक्कुल,बालकृष्ण मल्ल्याळ, सनी शेट्टी, बालाजी गुंडे,अकील शेख, आसिफ पठाण, रवी गेंट्याल, विजय हरसुरे बजरंग गायकवाड हुसेन शेख,रफिक नदाफ राजन काशीद , शिवा श्रीराम,सानी कोंडा , अमोल काशीद सिद्राम गायकवाड, अमीना शेख, जुबेर शेख इब्राहिम मुल्ला, शबाना सय्यद, शहाबुद्दीन शेख,भारत पाथरुट श्रीनिवास गड्डाम, प्रवीण आडम, गीता वासम, बन्सी कजाकवाके विजय मरेड्डी, श्रीनिवास तंगडगी, अंबादास बिंगी, प्रकाश कुर्हाड,आदींनी परिश्रम घेतले.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका