सोलापुरात ‘एसआरपीएफ’ जवानाकडून गोळीबार, एकजण ठार
दोघेजण गंभीर जखमी
सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन मुंबई येथील ‘एसआरपीएफ’ जवानाने गोळीबार केल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे घडली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत एकजण जागीच ठार झाला असून दोघेजण जखमी झाल्याचे कळते.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली.
नितीन बाबुराव भोसकर असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बालाजी महात्मे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वैराग पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
(बातमी अपडेट होत आहे.)