‘सैराट’फेम रिंकू राजगुरू आज पंढरपुरात

'येवले चहा'चे करणार उद्घाटन, चाहते झाले आतूर

Spread the love

पंढरपूर (डॉ. नाना हालंगडे) : ‘सैराट’फेम आर्ची तथा सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू आज पंढरपुरात येत आहे. तिच्या हस्ते ‘येवले चहा’चे उद्घाटन होणार आहे. तिची झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत. रविवार, ३१ रोजी सायंकाळी सहा वाजता पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील कुकाजी कॉम्प्लेक्स, चौफाळा येथे हा कार्यक्रम होईल.

कोण आहे रिंकू राजगुरू?
रिंकू तथा आर्चीचे मूळ नाव प्रेरणा महादेव राजगुरु आहे. ती रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकू ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. तिचे शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला या (अकलूज, जि.सोलापूर) शाळेमध्ये झाले.

साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेल्या परंतु धाडसी आणि निश्चयी अशा अर्चना पाटील उर्फ आर्चीची धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने नटविल्याने सर्वत्र रिंकूचे कौतुक झाले.

जीवनात प्रथमच सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून इतका सुंदर अभिनय तिने कसा केला असेल ह्याबद्दल तिचे सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करतात. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले. तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकूला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.

  • रिंकूचा चंदेरी प्रवास
  • चित्रपट
    १) सैराट (मराठी- २०१६), आर्ची (अर्चना पाटील)ची भूमिका. ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग) मिळाला.
    २) मनसू मल्लिगे (कन्नड-२०१७), सानवीची भूमिका.
    ३) कागर (मराठी) २६ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित.
    ४) मेकअप (मराठी) ७ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित.
    ५) झुंड (हिंदी) प्रदर्शित होणार आहे.
  • मालिका
    हंट्रेड या वेब सीरिजमध्ये नेत्रा पाटील ही भूमिका साकारली. हॉटस्टारवर ही मालिका प्रदर्शित झाली.
  • पुरस्कार
    स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग).

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका