‘सैराट’फेम आकाश ठोसर उद्या सोलापूरात
हॉटेल ध्रुवचे करणार उदघाटन, चाहत्यांसाठी गुडन्यूज
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : मराठी चित्रपटसृष्टीत यशाचा विक्रम केलेल्या ‘सैराट’ चित्रपटाचा नायक परश्या उर्फ आकाश ठोसर (Akash Thosar) उद्या सोलापूरात येत आहे. त्याच्या हस्ते एका हॉटेलचे उदघाटन होत आहे.
सोलापूरातील पूर्वभागातील हॉटेल ध्रुव रॉयल या एसी फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन बुधवारी ( ता. ८) सायंकाळी सहाला ‘सैराट’फेम आकाश ठोसर याच्या उपस्थितीत होणार आहे. युवा उद्योजक अरविंद शिंदे यांनी सारा स्टोन क्रशरमध्ये यश मिळवल्यानंतर त्यांचे मोठे बंधू अनिल शिंदे यांनी बिल्डींग मटेरियल सप्लायर्समध्ये यशाचे शिखर गाठले. त्यांच्या पाठोपाठ लहान बंधू अतिश शिंदे यांनी विविध व्यवसायातून यशाची शिखरे सर करत ध्रुव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर हॉटेल ध्रुव रॉयलची निर्मिती केली.
संपूर्ण एसी असलेल्या या हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय करण्यात आली आहे. सकाळी सात ते अकरा नाश्ता आणि त्यानंतर रात्री १० पर्यंत जेवण अशा त्याच्या वेळा आहेत. हॉटेलमधील स्टाफ हा बंगाल आणि कोलकता येथून मागवला आहे. प्रशिक्षित शेफ असल्याने ग्राहकांना हवे ते मिळणार आहे. पूर्वभागाच्या बाहेर जाण्याची वेळ येणार नाही.
चाहत्यांना परश्याचे आकर्षण
सैराटचा नायक आकाश ठोसर हा सोलापूरात येत असल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याला पाहण्यासाठी गर्दी उसळ्याची शक्यता आहे.
आकाश ठोसर यशाच्या शिखरावर
अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला आकाश ठोसर ‘सैराट’ (Sairat) सिनेमातून जगभरात पोहोचला आणि लोकप्रिय ठरला. परश्याची भूमिका साकारून आकाश ठोसरने सिनेक्षेत्रात आपली जागा निर्माण केली. ‘सैराट’ नंतर आकाश ठोसर अनेक छोट्या छोट्या गोष्टी करताना दिसला. ‘एफयू’ सिनेमा, ‘लस्ट स्टोरी’ वेबसिरीज (OTT) या दोन गोष्टींनंतर आता आकाश जाहिरातीमध्ये देखील झळकला आहे.
बॉलिवूडचा ‘बाजीराव’ (Bajirao) ठरलेला अभिनेता रणवीर सिंहसोबत (Ranveer Sinh) आकाश ठोसरने स्क्रिन शेअर केली आहे. ‘सेट-वेट’च्या जाहिरातीमध्ये आकाश आणि रणवीर सिंह एकत्र दिसले आहेत. आकाशने ही जाहिरात इंस्टाग्रामवर शेअर केलीय.
हेही वाचा : केंद्रीय विद्यापीठांत ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती
आकाश ठोसरने ‘सैराट’ सिनेमात गावरान मुलाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर त्याच्यामध्ये झालेला बदल हा लक्षवेधी ठरला. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) या दोघांनी अभिनयाची पार्श्वभूमी नसताना स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. पहिल्या सिनेमानंतर या दोघांची वेगवेगळी काम सुरूच आहेत. असं असताना आकाश ठोसरने बॉलिवूडचा लक्षवेधी अभिनेता रणवीर सिंहसोबत काम केलं आहे.