सेल्फी काढत विद्यार्थिनीला मिठीत घेतले, नराधम शिक्षकाला अटक
सांगोला तालुक्यातील संतापजनक घटना
सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यात एक चीड आणणारी घटना घडली आहे. एका नराधम शिक्षकाने सेल्फिचा बहाणा करत अल्पवयीन मुलीला मिठीत घट्ट पकडले. याप्रकरणी या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
कवितेच्या वहीचा बहाणा करून शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला शाळेच्या खोलीत बोलावून घेत तिला जवळ ओढून दोघांचा स्वतःच्या मोबाइलमध्ये सेल्फी फोटो काढून विनयभंग केला. शाळा प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या शिक्षकाला अटक करून पंढरपूर येथील सत्र न्यायालयात हजर केले असता , न्यायाधीशांनी शिक्षक शत्रुघ्न भांगरे याला शुक्रवार , २० जानेवारीपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त अल्पवयीन विद्यार्थिनीने डान्स स्पर्धेत भाग घेतला होता . त्याची तयारी शिक्षक भांगरे करून घेत होता . त्यामुळे त्या विद्यार्थिनीशी त्याची जवळीक वाढली होती . कार्यक्रमादरम्यान त्या शिक्षकाने त्या विद्यार्थिनीला कवितेची वही पाहिजे म्हणून शाळेच्या मेकअप रुममध्ये बोलवून घेतले.
आपण एक सेल्फी काढू म्हणत मोबाइलमध्ये सेल्फी काढला. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीला जवळ ओढले. इतक्यात तिने त्यांना सोडा म्हणत असताना त्यांनी तिला मिठीत घट्ट पकडले. हा प्रकार शाळेतील दुसऱ्या एका शिक्षकाने पाहिल्यानंतर त्यांने विद्यार्थिनीला सोडून दिले.
दरम्यान, या प्रकारानंतर शिक्षक भांगरे यांनी त्या विद्यार्थिनीला फोन करून झालेल्या गोष्टीबद्दल कोणाला सांगू नको , ते सर आपल्या दोघांना बदनाम करण्यासाठी म्हणत त्याच्या दोघांचा दोघांचा सेल्फी काहीही करतील, आपण उलट तेच आम्हाला मुद्दाम त्रास देतात , असे सगळ्यांना सांगू म्हणाला.
दरम्यान , घडल्या प्रकारानंतर शाळा प्रशासनाने शिक्षक भांगरे याला चौकशी करण्यासाठी लेखी , तोंडी व सहकाऱ्यामार्फत समज देऊन शाळेत हजर राहण्याबाबत सांगितले होते . परंतु, त्याने वरील सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले व चौकशीकरिता शाळेत हजर राहिला नाही . उलट इतर मार्गाने शाळेवर दबाव आणत होता . अखेर शाळा प्रशासनाने त्यांच्या दबावाला न जुमानता पोलिसात फिर्याद दिली.
या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सांगोला तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा