“सेक्स तंत्रा” कार्यक्रम अखेर रद्द
वाचा नेमका काय आहे प्रकार

Pune: Think Tank News Network
“सेक्स तंत्रा” नावाचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून या सेक्स तंत्राच्या आयोजकांचा शोध सुरु झाला. तेव्हा या सेक्स तंत्राचे आयोजन करणारे सत्यम, शिवम, सुंदरम फाऊंडेशन हे उत्तर प्रदेशातील असल्याचं आणि रवी सिंग हा त्याचा प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी इशारा देताच या रवी सिंगने हा कार्यक्रम रद्द करत असल्याचे जाहीर केले.

काही दिवसांवर येवून ठेपलेल्या नवरात्रात 1, 2 आणि 3 ऑक्टोबरला पुण्यामध्ये या सेक्स तंत्राचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती पंधरा हजार रुपये फी आकारण्यात आली होती. त्यासाठी क्यू आर कोड आणि एक फोन नंबर देखील देण्यात आला होता.
या जाहिरातीत वैदिक सेक्स तंत्रा, डिव्हाईन फेमिनाईन मॅस्क्युलाइन एंबॉडीमेंट, चक्र अॅक्टिव्हेशन, ओशो मेडिटेशन या कॅटेगिरीचा समावेश होता. पण या सेक्स तंत्राचा ओशोंच्या शिकवणुकीशी आणि तत्त्वज्ञानाशी कोणताही संबंध नाही असं ओशोंच्या अनुयायांचे म्हणणे आहे.
या सेक्स तंत्राचा संबंध नवरात्रीशी जोडून तरुणाईला आकर्षित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. पण पुण्यातील विविध सामाजिक संघटनांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन हा कार्यक्रम रोखण्याची मागणी केली .पुण्यातील अनेक सामाजिक आणि धार्मिक आणि राजकीय संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केल्यानंतर पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांची चौकशी सुरु केली. त्यानंतर आयोजकांनी या कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे पोलिसांकडून या सेक्स तंत्राच्या आयोजकांचा शोध सुरु झाला. तेव्हा या सेक्स तंत्राचे आयोजन करणारे सत्यम, शिवम, सुंदरम फाऊंडेशन हे उत्तर प्रदेशातील असल्याचं आणि रवी सिंग हा त्याचा प्रमुख असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी इशारा देताच या रवी सिंगने हा कार्यक्रम रद्द करत असल्याचं सांगितले आहे. हा कार्यक्रम रद्द झाला असला तरी या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पाहा खास व्हिडिओ