सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
पुण्यात झाला कार्यक्रम
पुणे (विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक, संगीतकार साजन बेंद्रे व विशाल यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे महासचिव अनिल जाधव यांच्या उपस्थितीत पुणे येथे हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत साजन-विशाल
साजन बेंद्रे व विशाल ही जोडी तरुण रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. पारंपरिक गितांसोबतच भक्तीगीते, उडत्या चालीची अनेक गीते या जोडीने गायली आहेत. मध्यंतरी या जोडीने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावरही गीत गायले होते.
अनेक गाणी लोकप्रिय
साजन यांची अनेक गाणी लोकप्रिय आहेत. ‘बुलाती है मगर जाने का नहीं’, ‘बोल मै हलगी बजाऊँ क्या’, ‘जीव लागलाय माझा झुरणीला’, ‘जयभीम झिंदाबाद’, ‘नाच शालू नाच’, ‘लागला डोळा माझ्या येडुला’, ‘लखाबाई हलगीच्या टिपरूत’, ‘जागी होती यल्लमा’, ‘हमको सताना छोड दो’, ‘गोरा नवरा बघाना’, ‘भाग्यवंत सोलापूर’ अशी अनेक गाणी गायली आहेत.
कलाकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.
– साजन बेंद्रे