सांगोल्यात रस्त्यावरील खड्ड्यात माती कालवणारा “पाटील” कोण?

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी करतात काय?

Spread the love

सांगोला तालुक्याला कोणी वालीच नाही. त्यामुळे अधिकारीही बेभानपणे वागत आहेत. ते आपल्या अधिकार, कर्तव्याला विसरले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अव्वलस्थानी आहे. रस्त्यावरील खड्ड्यात माती भरून पैसा खाणारे हे ना-ला-य-क अधिकारी तालुक्यात शिरजोर झाले आहेत. त्यामुळे तालुकावासियाना प्रवासा दरम्यान अनंत अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

सांगोला / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. रस्ता की खड्डा याचा अंदाजच येत नाही. अशात रस्त्याला मातीत घालणारा एक पाटील सांगोल्यात सार्वजनिक बांधकाम विभागात शिरजोर झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. हा चक्क रस्त्यातील खड्ड्यात माती भरून मी किती कर्तव्यदक्ष आहे, याचा आव आणत आहे.

सांगोला तालुक्याला कोणी वालीच नाही. त्यामुळे अधिकारीही बेभानपणे वागत आहेत. ते आपल्या अधिकार, कर्तव्याला विसरले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अव्वलस्थानी आहे. रस्त्यावरील खड्ड्यात माती भरून पैसा खाणारे हे ना-ला-य-क अधिकारी तालुक्यात शिरजोर झाले आहेत. त्यामुळे तालुकावासियाना प्रवासा दरम्यान अनंत अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

सांगोला तालुक्यातील सर्वाधिक रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत आहेत. पण आजपर्यंत जी कामे झाली ती दर्जाहीनच. काळ्या डांबरातून काळी माया गोळा करणारे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी तालुक्यात शिरजोर झाले आहेत.

तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. यामध्ये सांगोला-महुद, सांगोला- घेरडी, घेरडी-शिरशी हद्द, घेरडी- डिकसळ, जवळा-हतिद, सांगोला-लोटेवाडी,जवळा- डिकसळ-नराळे, सांगोला-शिरभावी यासह अन्य रस्त्यांची दाणादाण उडालेली आहे.

रस्ता की खड्डा याचा अंदाजच येत नाही. अशात याच बांधकाम विभागातील एक पाटील मात्र जणू काय मीच मालक आहे. या तालुक्यांचा या आविर्भावात रस्त्यावरील खड्ड्यात चक्क माती भरून आपले उकल पांढरे करून घेत आहे. याने हा प्रकार घेरडी-पारे-जत रोडवरील डिकसळ फाट्यावरील एका पुलावर केलेला आहे. उलट हा पम्हणतो, यासाठी निधी नाही मीच या रस्त्यावर मुरूम टाकीत आहे. पण याने मुरुमाऐवजी माती टाकून हा पूल मातीत घातला आहे. असे प्रकार याने तालुक्यात केले आहेत.

त्यामुळे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमा (आबा) मोटे हे जनआंदोलन उभारून विभागाला जाब विचारणार आहेत.

कोण आहे हा पाटील?
खाबुगिरीत अव्वल असलेला सार्वजनिक बांधकाम विभाग तालुक्यात शिरजोर झाला आहे. उपभियांता गोडबोला तर कनिष्ठ अभियंते मातीतून पैसा गोळा करणारे. अशातच या विभागातील पाटील नामक एक कर्मचारी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे ठेके घेवून, मुरूमाऐवजी माती टाकून, रस्ते मातीत घालत आहे. अन् अशी ही कामे रात्रीच्या वेळी करून वरिष्ठकडून शाबासकी मिळवित आहे. त्यामुळे हा पाटील तालुक्यात शिरजोर झाला आहे.

सोमा आबा मोटे

सांगोला तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागानेच रस्त्यांची वाट लावलेली आहे. कोणत्याही कामांची गुणवत्ता नाही. त्यामुळे तर तालुकाभर रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच अधिकारी खाबुगिरित पटाईत आहेत. त्यामुळे तालुकावासियांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. अशा या बांधकाम विभागाच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून जाब विचारणार आहे. यासाठी 1 जानेवारी रोजी आंदोलनही करणार आहे. सोमा (आबा) मोटे (जिल्हाध्यक्ष, रासप सोलापूर )

डिकसळहून जतला जाणाऱ्या मार्गावरील गेजगेवस्ती लगतच्या पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने माती टाकून हा पूल मातीत घातला आहे. हे काम या बांधकाम विभागाने रात्री कोणी नसताना केले असून याबाबत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला विचारले असता मी करेल तीच पूर्व दिशा, असे एका लोकप्रतिनिधीला म्हणाला. हा पूल त्या पाटलानेच मातीत घातला आहे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका