सांगोल्यात भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
पहिले बक्षीस ५१ हजारांचे; २ नोव्हेंबरपासून स्पर्धेस सुरुवात
सांगोला (नाना हालंगडे): देवा स्पोर्ट्स आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सांगोल्यात २ नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ५१ हजार रुपये (गटनेते तथा नगरसेवक आनंदा माने यांच्यातर्फे), द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ३१ हजार रूपये (तुकाराम तेली यांच्यातर्फे), तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस २१ हजार रूपये (काशिलिंग गावडे व अरुण पाटील यांच्यातर्फे), चतुर्थ क्रमांकाचे ११ हजारांचे बक्षीस (सुर्यकांत मेटकरी यांच्यातर्फे ) देण्यात येत आहे, अशी माहिती पवन सपाटे यांनी दिली.
आनंदा माने यांच्या मार्गदर्शनाखाली १५ वर्षापासून आयोजन
सांगोला नगर परिषदेचे गटनेते आनंदा माने यांच्या मार्गदर्शनाखाली देवा स्पोर्ट्स यांच्यातर्फे गेली १५ वर्षापासून या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यंदाही कोरोनाचे सर्व नियम पाळून नव्या जोमाने या स्पर्धा होणार आहेत. या चार मोठ्या रकमेच्या बक्षीसांसह इतरही असंख्य बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सलग पाच चौकार मारल्यास बिराभाऊ पुकले यांच्यातर्फे २००१ रू., प्रथम अर्धशतकास विनायक पाटील यांच्यातर्फे २००१ रू., विकेट हॅटट्रिकला लक्ष्मण सावंत यांच्यातर्फे २००१ रू., उत्कृष्ट बॉलरला सुनील जगताप यांच्यातर्फे २००१ रू., सलग पाच षटकार मारल्यास पवन टेळे यांच्यातर्फे २००१ रू., उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास हरिभाऊ सपाटे यांच्यातर्फे २००१ रू. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्मार्टफोनही मिळणार
मॅन ऑफ द सिरीजला अभिषेक लिंगे यांच्यातर्फे स्मार्टफोन देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द मॅच (फायनल) ला सचिन कचरे यांच्यातर्फे २९०१ रुपये व कीट देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द क्वालीफायरला १ टी-शर्ट देण्यात येणार आहे. चषक सौजन्य कै. कलावती विठ्ठल गाडेकर, कै. पांडुरंग विठ्ठल गाडेकर, श्री. दादा नामदेव गाडेकर यांच्या नावे असेल. प्रवेश फी ५५०० रु. असेल. अनामत रक्कम २००० रु. असेल.
सदर स्पर्धेत ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी ओंकार परचंडे (९५६१११०८९०), पवन सपाटे (७३५०७५२६२६) या क्रमांकावर संपर्क साधावा.