सांगोल्यात डाळिंबबागा उद्ध्वस्त
जागतिक ओळख पुसण्याच्या वाटेवर
निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन होत असल्याने देशातील कानाकोपर्यातून डाळिंबाचे व्यापारी येऊन शेतकऱ्यांच्या बांधावरच डाळिंब खरेदी करू लागले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबीच्या आर्थिक व्यवहारामुळे तालुक्यातील एकूण आर्थिक व्यवहार पूर्णपणे बदलून गेले. मात्र, मर व पिन होल बोररमुळे (खोडकिडा) बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्याने दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे क्षेत्र घटू आहे. तालुक्याच्या अर्थकारणावर परिणाम करणाऱ्या या संकटाबाबत नेते, उद्योजक, अभ्यासक यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
सांगोला / नाना हालंगडे
सांगोल्याच्या डाळिंब कोठारालाच कीड लागली आहे. मर व पिन होल बोररमुळे (खोडकिडा) बागाच्या बागा उद्ध्वस्त होऊ लागल्याने दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे क्षेत्र घटू आहे. तालुक्यातील यापुढे अशाच डाळिंब बागा नष्ट होऊ लागल्या तर ‘सांगोल्याचे डाळिंब’ असलेली ओळख पुसून जाण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त होत आहे. सांगोला तालुक्याच्या अर्थकारणावर परिणाम करणाऱ्या या संकटाबाबत नेते, उद्योजक, अभ्यासक यांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
डाळिंबाने पुसला कलंक
सांगोला तालुका म्हणजे ‘दुष्काळ’ ही ओळख पुसण्याचे प्रमुख कारण म्हणजे तालुक्यातील असणारे डाळिंबाचे उत्पन्न होय. कमी पाण्यावर ज्या माळरानावर फक्त कुसळ उगवत होते तिथे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लाखो रुपयांचे डाळींबाचे उत्पन्न घेतले. डाळिंबाच्या वाढत्या क्षेत्रामुळे तसेच एकूण उत्पन्नामुळे तालुक्याची ओळखच गेल्या काही वर्षात बदलली आहे.

तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन होत असल्याने देशातील कानाकोपर्यातून डाळिंबाचे व्यापारी येऊन शेतकऱ्यांच्या बांधावरच डाळिंब खरेदी करू लागले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबीच्या आर्थिक व्यवहारामुळे तालुक्यातील एकूण आर्थिक व्यवहार पूर्णपणे बदलून गेले.
पूरक उद्योग कोसळणार?
डाळिंबाच्या मोठ्या उत्पन्नामुळे तालुक्यात इतर अनेक उद्योग, व्यवसाय वाढीस लागले. सध्या किड, मर व पिन होल बोबरसारख्या रोगाने डाळिंब बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कमी होवू लागले आहे. याचा परिणाम तालुक्यातील एकूण अर्थकारणावर दिसुन येणार आहे.
मर व पिन होल बोररमुळे बागा नष्ट
शेतकऱ्यांच्या जीवनमान बदलून गेलेल्या डाळिंब पिकाला सध्या मोठ्या प्रमाणात कीड लागली आहे. झाडे पिवळी पडून मोठ्या प्रमाणावर जळून जाऊ लागली आहे. यामुळे सुरुवातीला बागेतील एक दोन पिवळी पडून जळू लागलेले झाडे काही महिन्यातच संपूर्णपणे बागाच्या बागा सध्या जळून लागल्याचे चित्र सांगोला तालुक्यात दिसू लागले आहे. मर व पिन होल बोररमुळे तालुक्यातील अनेक बागा जळून जाऊ लागल्याने तालुक्यातील डाळिंब क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. या रोगामुळे झाडे जळून गेले आहेत तेथे नवीन लागवड केली असता रोपेही काही महिन्यात जळून जातात. त्यामुळे त्या क्षेत्रात लवकर नवीन बागही लावता येत नाही.
उपाययोजना करुन उत्पादक मेटाकुटीला
आपली डाळिंबाची झाडे जळून जाऊ नये म्हणून डाळिंब उत्पादक शेतकरी या क्षेत्रातील जाणकार, दुकानदार यांच्याकडून सांगितलेले नानाविध उपायोजना करू लागला आहे. झाडावर व झाडांच्या खोडावरती अनेक औषधांची फवारणी करीत आहेत. तसेच झाडाच्या मुळावाटेही औषधे ड्रीपद्वारे सोडली जात आहेत. मर व पिन होल बोररने झाडे जळुन जाण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे.