ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

सांगोल्याच्या राजकीय क्षितिजावर उगवलेला चंद्र : डॉ.बाबासाहेब देशमुख

जन्मदिन विशेष लेख

Spread the love

आता येणारी नगरपालिका निवडणूक व जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा ‘लाल बावटा’ पुन्हा फडकवण्याचा निर्धार दोघा युवा बंधूंनी केला असून निवडणूकीनंतर राज्यात पुरोगामी युवक संघटनेला नवी उभारी, नवा जोश आणि नवा अध्याय सुरू करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. हे स्वप्न स्वप्न न राहता सत्यात उतरावे व राज्यातील शेतकरी, कष्टकरी, दलित, शोषित, वंचित यांना न्याय द्यावा हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.

जन्मदिन विशेष/डॉ.नाना हालंगडे
महाराष्ट्राच्या विधानसभेतील भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख अखिल भारताला झाली, ते नेतृत्व म्हणजे आमदार भाई डॉ. गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांचे निधन दिनांक 30 जुलै 2021 रोजी झाले. त्यांच्या निधनाने सांगोला तालुक्याचा सूर्य मावळला व त्याचवेळी सांगोल्याच्या राजकीय क्षितिजावर डॉ.बाबासाहेब पोपटराव देशमुख नावाच्या शितल चंद्राचा उदय झाला.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा जन्म 3 जानेवारी म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्या जन्मदिनी पेनूर तालुका मोहोळ येथे झाला. प्राथमिक शिक्षण पेनुर येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत झाले. पाचवी नंतरचे माध्यमिक शिक्षण श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय तुळजापूर, तर 11 ते 12 वी दयानंद कॉलेज लातूर येथे झाले. बारावीत मिळालेल्या उत्तुंग यशामुळे औरंगाबाद येथील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजला एम.बी.बी.एस. ला अ‍ॅडमिशन मिळाले व तेथे त्यांना पहिली डॉक्टरेट पदवी मिळाली.

वर्षभर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून रुग्णांची सेवा केली. त्यानंतर ‘जनस्वास्थ सहयोग’ गनियारी (बिलासपुर छत्तीसगढ) या सेवाभावी संस्थेत दीड वर्षाहून अधिक काळ आदिवासी बांधवांची सेवा केली. यानंतर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे एम.डी. (मेडिसिन) पूर्ण केले.

रवींद्रनाथ टागोर इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियाक सायन्स कलकत्ता या एनजीओ संस्थेत डॉ. अभय बंग व राणी बंग यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एन.मिल. हा तीन वर्षाचा कोर्स करीत असताना (कोविड-19 च्या काळात) जवळजवळ पाच हजाराहून अधिक लोकांची अँजिओप्लास्टी व पेसमेकर बसवण्याचे यशस्वी काम केले.

एम.डी. करत असताना नॅशनल लेवलचे दोन पेपर प्रसिद्ध केले. तसेच इंटरनॅशनल जर्नल (जगप्रसिद्ध) तीन पेपर प्रसिद्ध केले. दक्षिण कोरियामध्ये भरलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 2021 मध्ये पेपर प्रेझेंट केला. तसेच 2019 मध्ये कलकत्ता येथे उद्भवलेल्या वादळात आदिवासी बांधवांना मदत कार्य करण्यात सक्रिय सहभाग घेतला.

( पुढे वाचा..)


डॉ.बाबासाहेब देशमुख तथा भैय्यासाहेब यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने व तसे त्यांना संस्कार झाल्याने त्यांनी अनेक सामाजिक संस्थांबरोबर समाजहितासाठी सामाजिक कार्यात सहभाग घेतला.

गोरगरीब, अनाथ मुलांच्या संगोपन कार्यात, एड्स निर्मूलन कार्यात ते अग्रेसर आहेत. गरीब, होतकरू, मुले व मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचे सतत सहकार्य असते. नव्या पिढीतील युवक-युवतींना प्रेरणा देणारे, दिशा देणारे एक उमलते नेतृत्व म्हणून सांगोला तालुका त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघत आहे. त्यांनी अनेक समाजोपयोगी संस्थेतून सामाजिक कार्यातून लोकांच्या अडचणी सोडवून त्यांना धीर व आधार देण्याचे काम अखंड सुरू ठेवले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून मी माझ्या कौटुंबिक जीवनात अनुभव घेतला आहे.

त्यांना खेळाची विशेष आवड आहे. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना 17 वर्षाखालील गटात हॉलीबॉलचे चॅम्पियनशीप व एम.बी.बी.एस. करीत असताना राज्यस्तरीय व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची दखल महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकर्‍यांचा तारणहार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे शेकापचे सरचिटणीस धडाडीचे आमदार भाई जयंत पाटील (अलिबाग) यांनी दखल घेतली. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांची पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी व राज्य चिटणीस मंडळाच्या सदस्यपदी निवड केली.

त्यांच्या बरोबरीनेच त्यांचे बंधू म्हणजे ज्येष्ठ शेकाप नेते चंद्रकांतदादा देशमुख यांचे चिरंजीव डॉ.अनिकेत देशमुख यांची पुरोगामी युवक संघटनेचे सचिवपदी निवड केली. संघटनेच्या पदाची सूत्रे हाती घेताच दोघा बंधूंनी सांगोला तालुक्यातील जनतेच्या अडचणी सोडविण्याचा जणू सपाटाच सुरू केला. यामध्ये खास करून शेतकर्‍यांच्या विजेचा प्रश्‍न अत्यंत कौशल्यपूर्ण हाताळला व शेतकर्‍यांना दिलासा दिला.

आता येणारी नगरपालिका निवडणूक व जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा ‘लाल बावटा’ पुन्हा फडकवण्याचा निर्धार दोघा युवा बंधूंनी केला असून निवडणूकीनंतर राज्यात पुरोगामी युवक संघटनेला नवी उभारी, नवा जोश आणि नवा अध्याय सुरू करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे. हे स्वप्न स्वप्न न राहता सत्यात उतरावे व राज्यातील शेतकरी, कष्टकरी, दलित, शोषित, वंचित यांना न्याय द्यावा हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका