सांगोल्याच्या नीलकंठ शिंदेनी २७७ दिवसांत पूर्ण केला 10 हजार कि.मी सायकलींगचा प्रवास
१९ शतक आणि ३४ अर्धशतकाच्या रायडिंग
सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
सांगोल्यातील नीलकंठ वामनराव शिंदे सर यांनी कोणतेही उद्दिष्ट न ठेवता केवळ आरोग्य सदृढ रहावे, व्यायामाच्या दृष्टिकोनातून जानेवारी २०२१ ते सप्टेंबर २०२१ या दरम्यान २७७ दिवसात १००००km सायकलिंगचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून यामध्ये १९ शतक व ३४ अर्ध शतकांचे राइड समाविष्ट असून दिनांक ०७/१०/ २०२१ अखेर १०५३७ किलोमीटर पूर्ण झाले असून यामध्ये त्यांनी सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, कोल्हापूर या जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातून सायकलिंग करून सायकलींगचा सर्वत्र संदेश दिला आहे.
ऑल इंडिया सायकल क्लब, पुणे सायकलींग क्लब,बारामती क्लब, सोलापूर जिल्हा सायकलिस्ट फाउंडेशन, फलटण असोसिएशन क्लब , इंडो अथलेतिक सोसायटी ग्रुप यासह विविध क्लबने वेळोवेळी भरवलेल्या स्पर्धेत त्यांनी सहभाग आवर्जून नोंदवीला. त्याचबरोबर प्रत्येक स्पर्धा त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली असून सध्या ते दररोज ते ३0 ते ४0 किलोमीटर सायकलिंग करीत आहेत. सांगोला -सोलापूर – अक्कलकोट सोलापूर- मोहोळ हा वैशिष्ट्यपूर्ण असा टप्पा अकरा तासात पूर्ण करून सोलापूर जिल्हा पर्यटन प्रदूषण मुक्त वारी २०२१ स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले. त्याचबरोबर सलग २६ दिवस फिटनेस, आषाढी वारी, श्रावण मास, गणेश उत्सव, नवरात्र फेस्टीवल, यासह विविध राजकीय नेत्यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित केलेल्या अनेक ठिकाणी विशिष्ट वेळेत पोहोचून सायकलींगचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
सर्वत्र निसर्ग संवर्धन राखले पाहिजे, होणारे प्रदूषण कमी केले पाहिजे, जेवढी महाराष्ट्रातील उर्वरित ऐतिहासिक ,पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र सायकलिंगद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. संपूर्ण सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात असणाऱ्या पर्यटन स्थळे व ऐतिहासिक स्थळांना सायकलिंगद्वारे भेटी दिल्याने तेथील भौगोलिक परिस्थिती त्याच बरोबर आपल्या जिल्ह्यातील लोकांचे राहणीमान तेथील जीवन पद्धती अनुभवाला मिळाल्याचे व आपल्या परिसरात असणाऱ्या अनेक अनोळखी लोकांचा स्नेह वाढण्यास मदत मिळाली, आतापर्यंत आमच्या सायकलिंग ग्रुपने पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गड, किल्ले सायकलिंग करून तेथील स्वच्छता व गडकिल्ले संवर्धनाचे काम हाती घेतले आहे.
‘वंचित’ला आणखी एक धक्का, प्रदेश महासचिवाचा भाजपात प्रवेश