सांगोल्याच्या “त्या” नेत्याकडून “मातोश्री”चा उद्धार, शेतकऱ्याला केली शिवीगाळ

लाईट नसल्याची तक्रार करणं पडलं महागात

Spread the love

थिंक टँक न्यूज नेटवर्क
निवडणुकीवेळी मतदाराच्या पायाशी लोळण घेणारे नेते निवडणूक संपल्यावर मतदाराच्या उरावर बसून कसे गुण उधळतात याचा प्रत्यय अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत येत असतो. सांगोला तालुका तरी त्याला अपवाद कसा असेल. “मातोश्री”च्या उपकारावर जनतेचे नेतृत्व करण्याची संधी पदरात पाडून घेतलेल्या एका नेत्याने चक्क “मातोश्री” या शब्दालाच काळीमा फासला. राग व्यक्त करण्याच्या नादात नको ती भाषा वापरली. या संभाषणाची क्लिप दिवसभर व्हायरल झाली.

त्याचं झालं असं. सांगोला तालुक्यात महावितरणचे अधिकारी वीजबिल वसुलीसाठी रणांगणात उतरले आहेत. वरून आदेश असल्याने ही वसुली जोरात सुरू आहे. जे भरत नाहीत त्यांचे कनेक्शन कट केले जात आहे. त्यातच वीज पुरवठ्याच्या वेळेचा घोळ. ज्याच्या विहिरीत, बोअरमध्ये पाणी आहे त्यांना लाईटअभावी पाणी देता येत नाही. दोन्हीकडून मरण.

तालुक्यातील दंडाचीवाडी इथल्या एका शेतकऱ्याने या गावात लाईट नसल्याची तक्रार करण्यासाठी या नेत्याला कॉल केला. नेते बहुतेक जेवणमालपाणी घेऊन झोपले असावेत. चित्ती समाधी लागण्याची वेळ असतानाच कॉलने घोळ केला.

“मी रात्री एक वाजताबी फोन घ्यायला पायजी असा नियम केलाय काय?, मत दिलं म्हंजी आमच्या…… ला” असे म्हणत त्यांनी “मातोश्री”चा उद्धार केला. “मातोश्री” इथून तिथून वंदनीय. ती कोणाची का असेना.

एवढी वर्षे सुरू असलेला राजकीय वनवास “मातोश्री”च्या आशीर्वादाने संपला. आपल्याला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. अजूनही पुढे संधीची दारं खुली आहेत. हे सारं विसरून त्या नेत्याने आपल्याच मतदासंघातील मतदारराजा असलेल्या शेतकऱ्यासोबत फोनवरून बोलताना केलेला “मातोश्री”चा उध्दार चीड आणणारा आहे.

फोनकॉलच्या व्हायरल क्लिपमधील संवाद

हॅलो.. (….) बोलतोय (शेतकरी नेत्याचे नाव घेऊन ते आहेत का असे विचारतो)

हॅलो… (नेत्याचा आवाज)
हॅलो… कोण (नेत्याचा आवाज)
बोलतोय साहेब… (शेतकरी)

हॅलो…..
काय झालंय ओ…( नेता)

कोण हाय.. साहेब हायत का… (शेतकरी)

हं.. बोलतोय बोला (नेता)

आओ लाईट आचकदानीला चालू हाय आन दंडाच्यावाडीला नाय सायब (शेतकरी)

मी रात्री एक वाजताबी फोन घ्यायला पायजी असा नियम केलाय काय? मत दिलं म्हंजी आमच्या…… ला… (“मातोश्री”चा उध्दार)
——-
ही क्लिप व्हायरल होताच तालुक्यात खळबळ उडाली आहे. या क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका