ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजन
Trending

सांगोल्याची लेक झळकणार स्पर्श चित्रपटात

सायली कांबळेचा थक्क करणारा प्रवास

Spread the love

सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे दहावीचे शिक्षण घेतले असून अमोल महिमकर यांच्या मार्गदर्शनात तिच्यातील कालगुणांना वाव मिळाला. सायली हुचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व जु. कॉलेज सांगोला येथे झाले आहे. सध्या ती फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे. अभिनेत्री सायली कांबळे हिला लहानपणापासून अभिनयाची व नृत्याची आवड आहे. सांगोला महाविद्यालयचे प्रा.डॉ.विधीन कांबळे यांची कन्या असून घरातील आई-वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व चांगल्या संस्कारामुळे ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

स्पेशल रिपोर्ट/ नाना हालंगडे
दुष्काळी तालुका ही ओळख सांगोला तालुक्याने केव्हाच फेकून दिली आहे. सांगोला तालुक्यातील माणसं जिथं हात लावील त्याच सोनं करतात. चित्रपट क्षेत्रातही सांगोल्याच्या लेकीने दमदार पदार्पण केलं आहे.

सायली कांबळे असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. सायली ही सांगोला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विधीन कांबळे यांची कन्या आहे.

(Advt.)

शिवानी फिल्मस नूतन माने प्रस्तुत लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक श्रीद्त्त पांडुरंग माने यांचा मराठी चित्रपट “स्पर्श” आज 24 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

“स्पर्श” या चित्रपटात सांगोल्यातील अभिनेत्री कु. “सायली कांबळे” हिने “उर्मिची” प्रमुख भूमिका साकारली आहे. सदर कथानक हृदयस्पर्शी असून एका वेगळ्या विषयीची मांडणी केली आहे.

Writer, producer and director Sridatta Pandurang Mane’s Marathi film “Sparsh” is releasing in theaters in Maharashtra today on February 24th, presented by Shivani Films Nutan Mane. Actress from Sangola in the movie “Sparsh”. “Saili Kamble” plays the lead role of “Urmi”. The story is touching and a different subject has been arranged.

प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या कुटुंबातील उर्मीच्या कपाळी अकाली वैधव्य येते. पुढे विधवाचे आयुष्य जगणाऱ्या उर्मीच्या आयुष्यात एका निस्वार्थी तरुणाच्या प्रेमाचे वळण येते आणि इथून तिच्या आयुष्याच्या नव्या संघर्षाला सुरुवात होते.

जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकरासाठी सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जाऊन पुढे ती प्रेमासाठी बंड पुकारते का ? शेवटी दोघे एकत्र येतील का ? जर दोघे एकत्र आले तर त्यांचे प्रेम यशस्वी होईल का ? ते पहाण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी आपल्या जवळच्या चित्रपट गृहात “स्पर्श” हा मराठी चित्रपट पाहायला विसरू नका.

मराठी चित्रपट क्षेत्रातील जडण-घडणीमध्ये अनेकांचा वाटा आहे.”स्पर्श” चित्रपटाचे निर्माते श्रीद्त्त माने यांनी अभिनेत्री सायली कांबळेची “स्पर्श” चित्रपटासाठी निवड करून तिला चित्रपट जगतात उतरवले हे फार कौतुकास्पद आहे.

सायलीची अनेक लघुपट व चित्रपटात भूमिका
“वळण” या लघुपटाबरोबरच”जांभूळबेट”या चित्रपटात राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त कलाकार “हंसराज जगताप” टिंग्या चित्रपटातील “शरद गोयेकर” यांच्या समवेत भूमिका केली आहे.”निर्झरासृष्टी फिल्म्स” निर्मित व दिग्दर्शक “देवदत्त धांडोरे” यांच्या “फांजर” या आगामी चित्रपटात “सायली कांबळे” हिने भूमिका साकारली आहे.

सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे दहावीचे शिक्षण घेतले असून अमोल महिमकर यांच्या मार्गदर्शनात तिच्यातील कालगुणांना वाव मिळाला. सायली हुचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व जु. कॉलेज सांगोला येथे झाले आहे. सध्या ती फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे. अभिनेत्री सायली कांबळे हिला लहानपणापासून अभिनयाची व नृत्याची आवड आहे. सांगोला महाविद्यालयचे प्रा.डॉ.विधीन कांबळे यांची कन्या असून घरातील आई-वडिलांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व चांगल्या संस्कारामुळे ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

मराठी चित्रपट क्षेत्रातील जडण-घडणीमध्ये अनेकांचा वाटा आहे.”स्पर्श” चित्रपटाचे निर्माते श्रीद्त्त माने यांनी अभिनेत्री सायली कांबळेची “स्पर्श” चित्रपटासाठी निवड करून तिला चित्रपट जगतात उतरवले हे फार कौतुकास्पद आहे.

हास्यसम्राट जितेश कोळी सर ,कवी नागेश भोसले सर, चित्रपट निर्माता देवदत्त धांडोरे चित्रपट अभिनेता दादासाहेब सावंत दिग्दर्शक जगन्नाथ गोफणे दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त सतीश आढाळ्कर चित्रपट निर्माते प्रशांत पाटील, नौशाद मुलाणी, महादेव कांबळे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.

अभिनेत्री सायली कांबळेच्या चित्रपट क्षेत्रातील पदार्पनामुळे सांगोला तालुक्याच्या लौकिकात नक्कीच भर पडेल. अभिनेत्री सायली कांबळेचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका