सांगोल्याचा जनावरांचा बाजार बंद
लंपीस्किनचा धोका वाढतोय; ७० लाखाची उलाढाल ठप्प
सांगोला/ नाना हालंगडे
संपूर्ण देशभर जनावरांमध्ये लम्पि स्किन प्रादुर्भाव वाढू लागला असून,आपल्या सोलापूर जिल्ह्यातही या रोगाची जनावरे सापडली आहेत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश 9 सप्टेंबर 2022 रोजी काढले आहेत.
सीना व भीमा नदीकाठी पूरस्थिती!
जनावरामध्ये त्वचेचा आजार अर्थात लंपीं स्किनचा प्रादुर्भाव राज्यभर वाढू लागला आहे.सोलापूर जिल्ह्यातही माळशिरस तालुक्यात लंपिग्रस्त जनावरे सापडल्याने प्रशान खाबडून जागे झाले आहे. जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ.नानासाहेब सोनवणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.नवनाथ नरळे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेवून, लंपीस्किनचा वाढता प्रादुर्भाव याबाबत माहिती दिली होती.
जिल्ह्यात 11 सप्टेंबरपर्यंत तुफान पावसाची शक्यता
त्यानुषागणे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारीच जिल्ह्यातील सर्वच जनावरांचे बाजार बंद करण्याचे आदेश काढले आहे.त्यात सांगोला येथील प्रसिद्ध जनावरांच्या बाजाराची समावेश आहे.
सांगोला येथील जनावरांचा बाजार हा दर रविवारी भरतो.पश्चिम महाराष्ट्रत हा प्रसिद्ध असा बाजार आहे. येथे दर अथोवडा बाजारात 70 लाख रुपयेहून अधिक रुपयाची उलाढाल होत असते.या बाजारात कोल्हापूर,सांगली,सातारा,उस्मानाबाद, नगर,पुणे यासह शेजारील कर्नाटक राज्यातील जनावरे आणि खरेदी दरांची चलती मोठ्या प्रमाणात असते.
येथील बाजारात जर्शी गायी,म्हैशी,खीलात गायी,बैल त्या पाठोपाठ शेळ्या मेंढ्या यांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. हा लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने तातडीने दाखल घेत,जिल्हाधिकारी यांना ही बाब निदर्शनास आणून दिली.तरी सर्व पशुपालकांनी खबरदारी घेत,आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे.गोठ्यात स्वच्छता राखावी,असेही आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीने ही असे बाजार बंदचे आदेश काढले आहेत. तरी सर्वांनी सहकार्य करावे असे, आवाहन चेअरमन गिरीष गंगथडे यांनी केले आहे