सांगोलेकरांनो गाफिल राहू नका

उद्यापासून नियमांत शिथिलता, दक्षतेचे आवाहन

Spread the love

सांगोला : सांगोला शहरात उद्या सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता देण्यात आली आहे. असे असले तरी नागरिकांनी गाफिल न राहता कोरोनाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांच्या निर्देशानुसार सांगोला शहरात उद्या सोमवार,दिनांक 23/08/2021 सकाळी 7 वाजेपासून पुढील आदेश होईपर्यंत खालील प्रमाणे विविध आस्थापना सुरू राहतील:

1)अत्यावश्यक सेवा / वस्तूशी संबंधित असणारी दुकाने/आस्थापना सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

2) बिगर अत्यावश्यक सेवा / वस्तूकशी संबंधित असणारी दुकाने/आस्थापना  सोमवार ते शुक्रवार दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. म्हणजेच अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णतः बंद राहतील.

3) हॉटेल/रेस्टॉवरंट हे त्यां्च्या एकुण क्षमतेच्या 50% क्षमतेने “सोमवार ते शुक्रवार” दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. दुपारी 4 नंतर केवळ पार्सल सेवा/घरपोच सेवा चालू राहतील.

शनिवार व रविवारी हॉटेल/रेस्टॉरंट येथे केवळ पार्सल सेवा/घरपोच सेवा चालू राहील म्हणजेच या दोन दिवशी हॉटेल मध्ये बसवून गिऱ्हाईक करता येणार नाही.

4) सूट दिलेली कार्यालये वगळून इतर खाजगी कार्यालये कामाच्या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

5) जीम/सलून/ब्युटी पार्लर , केंद्र / स्पा/ वेलनेस सेंटर एअर कंडीशन न वापरता अपॉईंटमेंट घेउनच दुपारी 4.00 वाजेपर्यंत एकुण क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू राहतील.
शनिवार,रविवारी या आस्थापना पूर्णपणे बंद राहतील

6) विवाह सोहळ्यासाठी एकुण 50 व्य्क्तींच्या मर्यादेत परवानगी राहील.

7) अंत्यविधींसाठी  20 व्य्क्तींची परवानगी राहील.

8) सार्वजनिक ठिकाणे / उघडी मैदाने / चालणे / सायकलींग हे दररोज सकाळी 5.00 पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत* चालु राहतील.

9) खेळ फक्त ऑटडोअर साठी दररोज सकाळी 5.00 पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत चालु राहतील.

10) सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल व सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू असेल,  असे सांगोला नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी कळवले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका