सांगोला साखर कारखान्याचे धुराडे लवकरच पेटणार

११ कामगारांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन

Spread the love

सांगोला/प्रतिनिधी
धाराशिव साखर कारखाना युनिट-४ अर्थात सांगोला साखर कारखान्याचे प्रथम गळीत हंगाम सन २०२१-२०२२ चा “मिल रोलर पूजन” ११ कामगारांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे सांगोला साखर कारखान्याचे धुराडे लवकरच पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

रोलरचे पूजन करताना माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील.

सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू होत असल्याने शेतकऱ्यांत, कामगारांत आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कर्मचाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून कारखाना सुस्थितीत आणला. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा पावसाचे हि प्रमाण सगळीकडे चांगल्याप्रकारे आहे. या हंगामात लवकर कारखाना सुरू करून भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू. पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, रणजीत भोसले, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे, सुहास शिंदे यासह जेष्ठ संचालक शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, विश्वंभर चव्हाण, संजय मेटकरी तसेच अधिकारी वर्ग, कर्मचारी, जेष्ठ मंडळी, मित्र परिवार उपस्थित होते.


टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका