सांगोला नगरपलिकेवर शेकाप-आनंदा माने गटाचा झेंडा फडकविणार : गटनेते आनंदा माने
शेकाप-आनंदा माने गटाच्या युतीची अधिकृत घोषणा
सांगोला/ एच नाना :
आगामी सांगोला नगरपालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष व आनंदा माने गटाच्या युतीची संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. सोमवार 27 सप्टेंबर रोजी शेकापच्या पक्ष कार्यालयात शेकापचे जेष्ठ नेते चंद्रकांत देशमुख व नगरसेवक आनंदा माने यांनी आगामी नगरपालिका निवडणूक युती करून लढवून नगरपालिकेवर आपलाच झेंडा फडकवणार असल्याचे सांगितल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष व नगरसेवक आनंदा माने गटाच्या सोमवारी दिवसभर बैठका पार पडल्या. या बैठकीत नगरपालिका निवडणूक युती करून लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर शेकापच्या पक्ष कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी नगरसेवक आनंदा माने म्हणाले, सध्या सांगोला शहरात साडे सात कोटींची विकासकामे प्रत्येक प्रभागात सुरू आहेत. यापूर्वी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आबासाहेबांसोबत चर्चा झाली होती. शब्द पाळणारा पक्ष म्हणून शेकापची ओळख आहे. स्व. आबासाहेबांनी दिलेला शब्द पाळणार असल्याचे जेष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांनी सांगितले आहे. प्रत्येक प्रभागातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आज सगळ्या गोष्टीला पूर्णविराम मिळाला आहे. नगरपालिका निवडणुकीत जागांबाबत कोणताही वाद-विवाद न होता शेकापसोबत युती झाली आहे. एकदिलाने, एकमताने पूर्ण ताकदीनिशी नगरपालिका निवडणूक लढवणार असून नगरपालिकेवर शेकाप-आनंदा माने गटाचा झेंडा फडकावणे हीच आबासाहेबांना श्रद्धांजली असेल असे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस शेकापचे जेष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, माजी नगराध्यक्ष मारुतीआबा बनकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, मार्केट कमिटीचे सभापती गिरीश गंगथडे, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, नगरसेवक आनंदा माने, नगरसेविका सौ. स्वातीताई मगर, नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, माजी नगराध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, नगरसेवक गजानन बनकर, नगरसेवक सुरेश माळी, विजय शिंदे, पांडुरंग पांढरे, माऊली तेली, भारत बनकर, संजीव शिंदे, राजू मगर, संतोष देवकते, तायाप्पा माने, राजेश खडतरे, बाळासाहेब बनसोडे, राजकुमार दौंडे, बाळासाहेब झपके, सूर्यकांत मेटकरी, अमोल लऊळकर, वैभव केदार, काशीलिंग गावडे, सचिन ढेरे यांच्यासह शेकाप व आनंदा माने गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.