ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी

सांगोला तालुक्यात सापडले पीएम किसान योजनेचे 11 हजार बोगस लाभार्थी

तहसीलदारांनी दिला गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Spread the love

सांगोला/नाना हालंगडे
सांगोला तालुक्यामध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (पी . एम . किसान ) 11 हजार 471 लाभार्थी अपात्र सापडले आहेत. या अपात्र लाभार्थ्यांनी शासनाचे घेतलेले अनुदान सात दिवसाच्या आत तहसील कार्यालय , सांगोला येथे न भरल्यास शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार अभिजीत सावर्डे – पाटील यांनी दिला आहे.

प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी फेब्रुवारी 2019 पासून लागू केलेली आहे . या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी यांना चार महिन्याला दोन हजार रुपये प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये अनुदान तीन हप्त्यांमध्ये देण्यात येते . प्रथमता गावातील तलाठी यांच्यामार्फत माहिती घेण्यात आली होती परंतु लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशान्वये एप्रिल 2019 नंतर सर्व महा – ई – सेवा व सी . एस . सी केंद्रात फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती .

या योजने अंतर्गत पात्र शेतकरी यांना दर ४ महिन्याला २००० / -रु . याप्रमाणे वार्षिक ६००० / -रु अनुदान तीन हप्तामध्ये देणेत येते . या योजनेसाठी पात्र असणाऱ्या खातेदार यांची माहिती सुरवातीला PM Kisan Portal वर तालुक्यातील तो लाभार्थी ज्या गावचा खातेदार असेल त्या गावामध्ये तलाठी यांचेमार्फत भरणेत आलेली होती परंतु त्यानंतर लाभार्थी यांची गैरसोय होवू नये म्हणून शासनाच्या आदेशान्वये एप्रिल २०१ ९ नंतर तालुक्यातील सर्व महा – ई – सेवा व CSC केंद्रात फॉर्म भरणेची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती.

परंतु महा – ई – सेवा केंद्र व CSC चालकाने काही अपात्र लाभार्थी यांची चुकीची माहिती वेबसाईट वर भरल्यामुळे नोकरीस असणारे एकाच घरातील १ पेक्षा जास्त लाभ घेणारे खातेदार . १८ वर्षाखालील लहान मुले , शेतजमीन नसणारे अशा अपात्र लाभार्थी यांना लाभ चालू झालेला आहे . सदरची बाब शासनाच्या निदर्शनास आलेनंतर सदर महा – ई – सेवा व CSC केंद्रावर फॉर्म भरणेची सुविधा बंद करणेत आलेली आहे .

सदर योजनेमध्ये सांगोला तालुक्यामध्ये सर्ध्यास्थतीत ७१४५५ लाभाथ्र्यांची नोंदणी झालेली आहे . सदर लाभार्थ्याची यादी गावनिहाय तलाठी यांच्याकडून पडताळणी केली असता आयकर भरत असणारे १४१ खातेदार , नोकरीस असणारे ८ ९ , मयत लाभार्थी ५१२ , दुबार नावे ३१२. सन २०१ ९ नंतर भूमीहीन झालेले खातेदार ३४० , शेतजमीन नसणारे ९ ६६२ एकाच घरातील १ पेक्षा जास्त लाभार्थी ४ ९ ५ असे विविध कारणांमुळे सांगोला तालुक्यामध्ये ११४७१ लाभार्थी अपात्र सापडलेले आहेत .

त्या अपात्र लाभार्थी यांच्या यादया गावनिहाय गावामध्ये तलाठी कार्यालय येथील नोटीस बोर्डवर लावणेत आलेल्या आहेत.

तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडून नोटीस देणेत आलेल्या आहेत . सदरच्या यादीमधील अपात्र लाभार्थ्यांनी आतापर्यंत घेतलेले सर्व अनुदान शासनास ७ दिवसाच्या आत तहसिल कार्यालय सांगोला येथे भरावे . सदर अपात्र लाभार्थी यांनी अनुदान शासनास ७ दिवसाच्या आत परत केले नाहीतर त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली म्हणून सांगोला पोलीस स्टेशन येथे फौजदारी स्वरूपाचा अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल यांची नोंद घ्यावी, असे त्यांनी कळविले आहे.

“पवार आणि ठाकरेंना ‘खंजीर’ चिन्ह द्या”

जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागणार?

माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका