सांगोला तालुक्यात भीषण अपघात, कारने दोघांना चिरडले

सांगोला (तालुका प्रतिनिधी)
भरधाव कारने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकी वरील एकजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार तर महिला जखमी झाली आहे असल्याची घटना रविवार दि. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार च्या सुमारास सांगोला मिरज रोड वरील गोडसेवाडी येथे घडली.

श्रीकांत दिगंबर मिसाळ वय ५५ रा. चिणके ता.सांगोला व भाग्यश्री शंकर माने वय ६५ ही महिला गंभीर जखमी झाली होती उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
श्रीकांत मिसाळ हे रविवार दि.१८ रोजी साडेचार वा.च्या सुमारास एम.एच.१० ए.एन. २४५७ या दुचाकीवरून चिणके ता. सांगोला येथून सांगोलाकडे निघाले असता अज्ञात भरधाव चार चाकी वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात श्रीकांत मिसाळ हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. तर भाग्यश्री माने यांना उपचारासाठी गंभीर जखमी अवस्थेत दाखल केले असता उपचारादरम्यान साडेआठच्या सुमारास भाग्यश्री माने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे चिंणके गावावर शोककळा पसरली आहे सदर अपघात झाल्यानंतर भरधाव कार अपघातस्थळी न थांबता तसेच निघून गेले असल्याची घटना घडली आहे. याबाबत नवनाथ शिवाजी मिसाळ यांनी अज्ञात कार चालकां विरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.