सांगोला तालुक्यात पहिल्याच दिवशी १३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

प्राथमिक शिक्षणधिकारी किरण लोहार यांनी दिली शाळांना भेट; १६७ शाळा सुरू

Spread the love

सांगोला/ डॉ.नाना हालंगडे : घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गडबड, उत्साह व उत्सुकता. शाळेतही शिक्षकांचीही लगबग, स्वागताची तयारी व विशेषतः विद्यार्थ्यांची टेंपरेचर-ऑक्सिजन तपासणीसाठीची वेगळी व्यवस्था. शाळाांमध्ये बाह्य व अंतरंगाची वेगवेगळ्या प्रकारची करण्यात आलेली रंगरंगोटी. निमित्त कोरोनाच्या महामारीमुळे सुमारे दिड वर्षानंतर सुरु झालेल्या शाळा. तालुक्यातील आज पाचवी ते बारावीच्या 167 शाळा सुरु झाल्या. यामध्ये 38 हजार 656 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 215 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांनी दिली.

सांगोला शहर व तालुक्यात आज शाळा सुरु झाल्या. शाळा सुरु झाल्याने मुलांना दिड वर्षानंतर शाळेत जाण्याची मोठी उत्सुकता दिसून आली. शाळेत विद्यार्थ्यांना कोरोनाच्या नियमाचे सर्वांकडून पालन होण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागत होती. अनेक शाळेत सोशल डिस्टसींगचे पालन करण्यासाठी फक्त मुलांना किंवा मुलींनाच शाळेत बोलावण्यात आले होते. आज सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगोला तालुक्यातील सांगोला विद्यामंदिर व जिल्हा परिषद परिषद शाळा बनकरवाडी शाळेस भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे, कैलास मडके, विस्ताराधिकारी बी. पी. इंगोले, केंद्रप्रमुख मच्छिंद्र जगताप, नामदेव भोसले उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी लोहार यांनी ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या मोहिमेची तालुक्यात यशस्वी राबविण्यात येत असल्याबद्दल कौतुक केले.

1) पाचवी ते आठवी जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळा संख्या – 64,
शाळा सुरु संख्या -64,
शिक्षक संख्या -114,
उपस्थित शिक्षक संख्या -112,
एकूण विद्यार्थी संख्या – 3 हजार 66,
उपस्थित विद्यार्थी संख्या – 1 हजार 107.
2) पाचवी ते बारावी शाळा सुरु – 103,
शिक्षक संख्या – 883,
उपस्थित शिक्षक संख्या – 879
एकूण विद्यार्थी संख्या – 35 हजार 623,
उपस्थित विद्यार्थी संख्या -12 हजार 118.

दिनांक 4/10/2021रोजी सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी  किरण लोहार यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनकरवाडी सांगोला केंद्र सांगोला या शाळेस अचानक भेट दिली. शालेय स्वच्छ आणि सुंदर परिसर ,आकर्षक रंगरंगोटी केलेली शालेय इमारत, संरक्षक भिंत पाहून भारावून गेले. प्रज्ञाचक्षु वाचनालय उघडे असलेले पाहून समाधान व्यक्त केले.स्वच्छतागृह, किचनशेड सहित संपूर्ण शालेय इमारत,
वर्गखोल्या पाहून आनंदित झाले. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही शिक्षणाची परिस्थिती पाहून सर्व शिक्षकांचे कौतूक केले. ऑफलाईन उपस्थित विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन पाहिले. उत्कृष्ट कार्य करत आहात म्हणून मुख्याध्यापक श्रीम.रा.रा.कोरे आणि शिक्षक वृंद श्रीम.अंजली बिराजदार ,श्री.सचिन गोडसे सर सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच शालेय व्यवस्थापन अध्यक्ष (बांधकाम सभापती सांगोला नगर परिषद) श्री. गजानन बनकर ,उपाध्यक्ष श्री.अनिल बनकर, माजी नगरसेवक श्री.शिवाजी बनकर ,उद्योजक श्री.सदाशिव बनकर, शिक्षणतज्ञ श्री.महादेव बनकर,सि. ए. श्री .उत्तम बनकर यांच्यासह सर्व पालकांचे ही अभिनंदन केले.श्री.रामचंद्र बनकर ,श्री.चंद्रकांत बनकर पालक ही उपस्थित होते.

सोबत सांगोला तालुका गटशिक्षणाधिकारी मा. प्रदीप करडे सांगोला केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ.नामदेव भोसले कडलास केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बाबासाहेब इंगोले ,तंत्र स्नेही शिक्षक श्री.कैलास मडके सर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी किरण लोहार साहेब यांची जवळ जवळ दोन तासांची भेट शाळेतील शिक्षक,विद्यार्थीआणि पालक या सर्वांसाठी सं संस्मरणिय ठरली.मुख्याध्यापिका श्रीम डॉ .कोरे मॅडम यांनी उपस्थित सर्वांचे स्वलिखित काव्यसंग्रह देऊन आभार मानले.

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका