सांगोला तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार
चिणकेत वीज पडून म्हैस ठार; चोपडीत घर कोसळले
सांगोला/ डॉ. नाना हालंगडे
मागील तीन दिवसांपासून सांगोला तालुक्यात परतीच्या पावसाने जोर लावला असून, शनिवारी तालुक्यात २१० मी. मी. इतका पाऊस पडला. यामध्ये चिणके येथील विवेक विजयानंद मिसाळ यांची ८० हजार रुपयांची पंढरपुरी म्हैस वीज अंगावर कोसळल्याने ठार झाली. तर चोपडी येथे घर कोसळल्याने हजारो रुपयाचे नुकसान झाले.
परतीच्या पावसाने सर्वत्र जोर धरला असून, शनिवारी हस्त नक्षत्राच्या शेवटच्या पावसाने दैनाच केली. विजांचा कडकडाट, वादळी वारे याने तालुक्यात जोरदार पाऊस पडला. रविवारी चित्रा नक्षत्र निघाले असून यामध्ये ही असाच जोर पहावयास मिळत आहे.
शनिवारी सायंकाळी ७ च्या सुमारास चिणके येथील सोनारसिद्ध मंदिरालगत असलेल्या विवेक मिसाळ यांच्या घरासमोर असलेल्या म्हैशीवर वीज कोसळल्याने ती जागीच ठार झाली. विशेष म्हणजे विवेक मिसाळ यांना एकमेव म्हैस होती. ही म्हैस ठार झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- हेही वाचा :जतजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात, एक ठार, दोघे गंभीर जखमी
- नगरपरिषद निवडणूक ठरवणार सांगोल्याचा आमदार
- जवळ्याच्या बाजारात हरवलेला मुलगा अखेर सापडला
याबाबत महसूल यंत्रणेने पंचनामा केला आहे. तर दुसऱ्या घटनेत चोपडी येथे एक घर कोसळले आहे. यामध्ये जीवितहानी झालेली नाही.
सांगोला तालुक्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस
(10/10/2021)
1. सांगोला – 47. 0 mm
2. हातीद – 6 . 0 mm
3. नाझरा – 23. 0 mm
4. महूद – 40. 0 mm
5. संगेवाडी – 2. 0 mm
6. सोनंद – 16 .0 mm
7. जवळा – 4. 0 mm
8. कोळा – 60. 0 mm
9. शिवणे – 12. 0 mm
______________________
Total – 210 .0 mm.
Average Rainfall – 23.33