सांगोला तालुक्यात गावोगावी गणपतराव देशमुखांसाठी प्रार्थना

आबासाहेबांच्या कुटुंबियांकडून धीर धरण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

Spread the love

सांगोला (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे लवकर बरे होऊन सांगोल्याला परतावेत यासाठी गावोगावी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक कार्यकर्ते आबासाहेबांच्या नाजूक प्रकृतीमुळे भावविवश होताना दिसत आहेत. आबासाहेबांच्या कुटुंबियांकडून धीर धरण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे. थिंक टँक लाईव्हच्या प्रतिनिधीने अश्विनी रुग्णालयात जाऊन आबासाहेबांचे चिरंजीव चंद्रकांतदादा देशमुख, नातू डॉ. अनिकेत व डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन आबासाहेबांच्या प्रकृतीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली.

सोशल मीडियावर सर्वांच्या नजरा
आबासाहेबांवर सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अाज बुधवारी सकाळी थिंक टँक लाईव्हच्या प्रतिनिधीने अश्विनी रुग्णालयात जाऊन आबासाहेबांचे चिरंजीव चंद्रकांतदादा देशमुख, नातू डॉ. अनिकेत व डॉ. बाबासाहेब देशमुख यांची भेट घेऊन आबासाहेबांच्या प्रकृतीबाबतची वस्तुस्थिती जाणून घेतली.

श्वसनक्रिया सक्षमतेने सुरू : डॉ. अनिकेत देशमुख
“आबासाहेबांची प्रकृती काल मंगळवारी अत्यंत नाजूक बनली होती हे खरे आहे. त्यांच्यावर सर्वतोपरी ताकदीने उपचार सुरू आहेत. त्यांची श्वसनक्रिया सक्षमतेने सुरू आहे. वयोमानामुळे शरीर उपचाराला कमी प्रतिसाद देणे साहजिक आहे. मात्र, सध्या आबासाहेबांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे.”
– डॉ. अनिकेत देशमुख (नातू)

आबासाहेब बरे होतील : डॉ. बाबासाहेब देशमुख
आबासाहेबांच्या तब्येतीत आज पहाटेपासून समाधानकारक सुधारणा होत अाहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात पूर्ण ताकदीने उपचार सुरू आहेत. आबासाहेब लवकर बरे व्हावेत अशी राज्यभरातील चाहत्यांची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जनतेच्या सदिच्छांमुळे आबासाहेब बरे होतील, अशी अपेक्षा आहे.
– डॉ. बाबासाहेब देशमुख (नातू)

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये : चंद्रकांत देशमुख
आबासाहेबांवर तज्ञ वैद्यकीय पथक उपचार करीत आहे. काल मंगळवारी चुकीच्या माहितीवर आधारित काहीजणांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. आबासाहेब आजही हिंमतीने या प्रसंगातून बाहेर पडतील व बरे होतील. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये.
– चंद्रकांत देशमुख (चिरंजीव)

चिंता करण्याचे कारण नाही : अॅड. सचिन देशमुख
सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती आहे की, कोणत्याही अफवांना बळी पडू नका. साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बी.पी. नॉर्मल आहे. शेकापचे नेते भाई जयंत पाटील हे थोड्याच वेळात सोलापूरला येत असून ते साहेबांना भेटतील आणि डॉक्टरांबरोबर चर्चा करणार आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. साहेब लवकर बरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी.
– अॅड सचिन देशमुख (जि.प. सदस्य)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका