सांगोला तालुक्यात अतिवृष्टीचा असाही दणका
४ हजार हेक्टरला फटका; १० कोटीचा प्रस्ताव
सांगोला / नाना हालंगडे
अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील ६ मंडलमधील ४३ गावातील सुमारे ३ हजार ८४०.३२ सेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तहसील कार्यालयाकडून पंचनामा अहवालासह नुकसानपोटी सुमारे १० कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे मागणी केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
सांगोला तालुक्यात यंदा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीचा पाऊस पडल्यामुळे काढणीला आलेली बाजरी मका सूर्यफूल खरीप पिके व रब्बी हंगामातील पेरलेली ज्वारी मका सुर्यफुल आदी शेती पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही हंगामात मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडलमध्ये सर्वाधिक १६७ टक्के त्याखालोखाल कोळा व सोनंद ११३ टक्के तर हातीद जवळा व घेरडी मंडलमध्ये ९७ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे प्रशासनाकडून आकडेवारी सांगितली जात आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सांगोला तालुक्यात सर्वच मंडलमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात खरीप व रब्बी हंगामातील पिके शेतात उभी असताना अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. महसूल प्रशासनाकडून तलाठी , ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्यामार्फत तालुक्यातील संगेवाडी, कोळा, हातीद ,सोनंद ,जवळ व घेरडी या सहा मंडलमधील ४३ गावातील – ७७८९ बाधित शेतकऱ्यांच्या -३८४०.३२ हेक्टर क्षेत्रातील सूर्यफूल, मका, ज्वारी, कांदा भाजीपाला, डाळिंब, द्राक्षे आदी शेती पिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत.
दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिराईत पिकांना प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, प्रति हेक्टरी बागायत पिकांना २७ हजार रुपये प्रती तर प्रती हेक्टरी फळपिके ३६ हजार रुपये प्र नुकसानी पोटी दिले जाणार आहेत.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची आमदार शहाजीबापू पाटील यांनी वाटंबरे, मांजरी व संगेवाडी येथील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे कोणतेही निकष न लावता शेती पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनीही संगेवाडी येथील थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाण्यातील सूर्यफूल पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे.
एकीकडे शेतकरी अद्याप पंचनामे झाले नाहीत असे सांगत असताना प्रशासनाकडून मात्र चार मंडल मधील पंचनामे करून नुकसानीची मागणी शासनाकडे केली आहे.
“घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही