सांगोला तालुक्यातील रस्ते होणार चकाचक
जवळा ते घेरडी व सांगोला रस्त्याचाही वनवास संपणार
सांगोला : सांगोला तालुक्यातील (Sangola Taluka) विविध १५ ठिकाणच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला असून या कामावर ३० कोटी रु. खर्चून रस्ते चकाचक केले जाणार आहेत.
तालुका हद्द ते शेरेवाडी रस्त्याचे भूमिपूजन रविवार दि .५ सप्टेंबर रोजी शेरेवाडी येथे सकाळी १० वा. पार पडले. सोबतच कटफळ ते अचकदाणी, शिरभावी ते खर्डी, वाढेगाव ते सावे व वाढेगाव ते कडलास, जिल्हा परिषदेकडील वाढेगाव ते राजापूर रस्ता, सांगोला आनंद नगर कोपटेवस्ती, इमडेवाडी, लक्ष्मीदहवडी, कडलास ते जवळा, जवळा ते कडलास, गोडसेवाडी ते वासुद अकोला या रस्त्याचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahaji Patil), माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपकआबा साळुंखे-पाटील (Ex.MLA Deepakaba Salunkhe-Patil) यांच्या हस्ते झाले. (NCP).
यावेळी प्रा.पी.सी.झपके , शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ ट, जि.प.सदस्य गोविंदआण्णा जरे, पंचायत समिती सदस्य रुपालीताई लवटे , पंचायत समिती सदस्य राजेंद्र मेटकरी, पंचायत समिती सदस्य वंदना गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, शिवसेना तालुका प्रमुख सुर्यकांत घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तानाजी काका पाटील, शिवसेना शहर प्रमुख कमरुद्दीन खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिंदे, माजी नगरसेवक प्रा.संजय देशमुख, शहर अध्यक्ष तोहीद मुल्ला, युवक नेते सागर पाटील, शहाजीराव नलवडे उपस्थित होते.
आमच्या WhatsAap Group मध्ये ज्वाईन व्हा : https://chat.whatsapp.com/CGzx2Z4spwMFLjqjQbMzgc
सांगोला बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकातील ३० कोटी रु. खर्चाच्या १३ रस्त्यांसाठी व जिल्हा परिषदेतील २८ लाख रु. खर्चाच्या २ अशा एकूण १५ रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे.
- हेही वाचा : सोलापूरात भूकंपाचे धक्के, नागरिकांत भिती
- हातभट्टीवाल्यांनो, सुधरा.. दुसरा धंदा करा
- शहाजीबापू व दीपकआबांचा लोटेवाडीत भरपावसात सत्कार
- सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी मेगाभरती
- सोलापूर महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी
- महाराष्ट्राचे राजकारण तिसऱ्या लाटेवर स्वार
जवळ्याला जोडणारे रस्तेही होणार चकाचक
जवळा ते घेरडी रस्त्याची खूप दुुरवस्था झाली होती. अनेक वर्षांपासून या मार्गावरील रस्त्यावर खूप खड्डे पडले होते. या खड्यांत वाहने अडकून अनेक अपघातही झाले आहेत. हा रस्ता दुरुस्त करावा, अशी ग्रामस्थांकडून मागणी होत होती. शिवाय जवळा ते कडलास हा रस्ताही खराब झाला होता. या मंजूर १५ रस्त्यांत जवळ्याला जोडणा-या दोन्ही रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग चकाचक होईल.