ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख

वाढदिवस विशेष लेख

Spread the love

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी जनतेच्या मनातील आमदार डॉ. अनिकेत देशमुख आहेत, असे सातत्याने बोलले जाते. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख हेच फिक्स आमदार असतील असे नियोजन शेकाप कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याचे दिसून येत आहे.

थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
दिवंगत आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब यांनी तब्बल अकरावेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. 2019 रोजी आबासाहेबांनी ऐनवेळी नातू डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुखांची उमेदवारी घोषित केली. भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या सहवासाने त्यांच्या कार्याचे जवळून निरीक्षण करून डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीवर टाकलेला प्रकाश.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी जनतेच्या मनातील आमदार डॉ. अनिकेत देशमुख आहेत, असे सातत्याने बोलले जाते. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत देशमुख हेच फिक्स आमदार असतील असे नियोजन शेकाप कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याचे दिसून येत आहे.

डॉ.अनिकेत देशमुख यांनी रुग्णसेवा, जनसेवा, समर्पण, निष्ठा, मेहनत व संघर्ष या पंचसूत्रीच्या माध्यमातून अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

स्व. आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख (आबासाहेब) यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत, त्यांच्या विचारांचा वारसा जपत डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे. “रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा” हे ब्रीद घेऊन त्यांनी आपल्या समाजसेवेस सुरुवात केली आहे.

उत्तम संघटन कौशल्य, मितभाषी स्वभाव
कुटूंबकर्त्याची संस्काराची शिदोरी, उत्तम संघटन कौशल्य, मितभाषी स्वभाव, या गुणधर्माच्या माध्यमातून अल्पवधीतच तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले सांगोला तालुक्या सारख्या पश्‍चिम भागातून महाराष्ट्राच्या राजकारणात झेप घेत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे संयमी व कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे डॉ अनिकेत देशमुख होय.

डॉ.अनिकेत (भैय्या) पराभूत होऊन सुद्धा स्वतः दिवंगत आबासाहेबांनी डॉ. अनिकेत देशमुख यांना सांगितलं होते की, “तुझं पूर्ण शिक्षण करून सांगोला मतदारसंघातील जनतेच्या कामगार, कष्टकरी , शेतकरी, शेतमजुर, गोर-गरीब जनतेची सेवा करण्यासाठी आला पाहिजे.”

आपल्या आजोबांनी दिलेला कानमंत्र प्रत्यक्षात उतरवत आता डॉ. अनिकेत हे जबाबदारी पार पाडीत आहेत. डॉ. अनिकेत देशमुख यांना उच्च शिक्षित झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसायात प्रगती करणे शक्य होते. परंतु आबासाहेबांनी भैय्यासाहेबांना जो वसा दिला आहे तो ते समर्थपणे सांभाळत आहेत.

सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करून सर्व जाती धर्मातील सर्व सामान्यांच्या शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजुर, दिन दुबळ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा मार्ग निवडला. गरिबांचे उपचारासाठी होत असलेले हाल व त्यांची हॉस्पिटलमध्ये होत असलेली परवड पाहून डॉ अनिकेत (भैय्या) देशमुखांना जनसेवेसोबतच रुग्ण सेवेच्या माध्यमातूनही आरोग्यजागर मांडला आहे. शक्य होईल तेवढी मदत करण्यासाठी स्वतः च्या खिशालाही झळ लावून घेतली. आणि खर्‍या अर्थाने त्यांच्या ’आरोग्ययज्ञास’ प्रारंभ झाला.

तुमच्या घरातील हे चॅनल्स होणार बंद

’आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्‍वर सेवा आहे. गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या असे आम्हा तरूणांना सांगून प्रेरणादायी कार्य करत आहे.

पद असेल वा नसेल पण ’रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ मानणारे डॉ.अनिकेत देशमुख सदैव गोर गरिबांच्या मदतीला धाऊन जातात. स्वतः वर जरी दुःखाचा डोंगर कोसळला तरी आरोग्यसेवेत व समाजसेवेत खंड पडू न देणारे डॉ.अनिकेत देशमुख हे एकमेवाद्वितीय आहेत.

‘शेकाप’च्या लाल रंगाशी एकरूप झालेली नवदुर्गा

आपल्या घरातील डोंगराऐवढे दुःख बाजूला सारून काळजावर दगड ठेऊन धैर्याने परिस्थितीशी झुंजणारे डॉ.अनिकेत देशमुख म्हणूनच लाखो युवकांसाठी ’प्रेरणादायी’ ठरतात.

स्वातीताईंनी रचला विकासकामांचा डोंगर

 

आपण मिळालेल्या आरोग्यसेवेच्या संधीचे सोने कराल यात शंकाच नाही. लाखो दुःखी, पीडित व गरजवंतांची जनसेवेच्या व रुग्ण सेवेच्या माध्यमातून आपल्या हातून सेवा घडो, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!

– डॉ. नाना हालंगडे

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका