सांगोला खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी इंजि.रमेश जाधव
व्हाईस चेअरमनपदी डिकसळचे तुकाराम भुसनर

सांगोला/ नाना हालंगडे
राज्यात अव्वलस्थानी असलेला सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाच्या नूतन चेअरमन अन् व्हाईस पदाच्या निवडी आज बुधवारी पार पडल्या. चेअरमनपदी इंजि.रमेश जाधव तर व्हाईस चेअरमनपदी डिकसळ आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम भुसनर यांची निवड करण्यात आली.
सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाची बिनविरोध निवड काही दिवसापूर्वी पार पडली होती. हा संघ पहिल्यापासून शेकापच्या ताब्यात आहे. शेकापकडे 14 जागा, अन् बापू आबा गटाकडे 3 जागा आहेत. हा संघ राज्यात अव्वल आहे.

बुधवारी याच संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. चेअरमनपदी स्व.पी.डी(अप्पा) जाधव यांचे चिरंजीव इंजि.रमेश जाधव तर सलग तिसऱ्या वेळेला संघात बिनविरोध निवडून आलेल्या तुकाराम भुसनर यांना व्हाईस चेअरमन पदाची संधी देण्यात आली.
स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या, सातत्याने बिनविरोध परंपरा असलेल्या सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया आताच पार पडली.
याच नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा चंद्रकांतदादा देशमुख,डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डिकसळकर तालुक्यात अव्वल
सांगोला तालुक्यात डिकसळकर नेहमीच अव्वलस्थानी असतात. एकनिष्ठ आणि स्व.आबासाहेबांचे विश्वासू सहकारी अशीच तुकाराम भुसनर यांची तालुक्यात ओळख आहे. गेली दोन टर्म ते संघाचे संचालक होते. आज तिसऱ्या टर्म वेळीही बिनविरोध आले अन आता संघाचे व्हाईस चेअरमन झाले.

या निवडणुक प्रक्रियेत भाई चंद्रकांदादा देशमुख, शेकापचे युवा नेते डॉ. बाबासाहेब आणि डॉ. अनिकेत देशमुख, दादाशेठ बाबर, इंजी.रमेश जाधव, तुकाराम भुसनर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत ही निवडणूक बिनविरोध पार पडली होती.
या संघाची स्थापना 1955 सालाची असून,1985 सालापासून या खरेदी विक्री संघावर शेकापचे वर्चस्व अबाधित आहे. यामध्ये 2 महिला सदस्या आहेत.

पंचवार्षिक निवडणूकीच्या १७ जागेसाठी दाखल झालेल्या ६० अर्जापैकी ५६ अर्ज वैद्य ठरले होते. तर ४ अर्ज अवैध (नामंजूर) झाले होते.
आतापर्यंत या संघाची परंपरा आहे. कायम बिनविरोध निवड पार पडलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा संघ फायदेशीर आहे.

खरेदी-विक्री संघाचे व्यक्तिगत २१६४ सभासद असून ८३ संस्था सभासद असे एकूण २२४७ सभासद होते.
सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाच्या स्थापनेपासून शेकापचे वर्चस्व आहे. यामध्ये काही जागा राष्ट्रवादीलाही दिल्या होत्या. पण आता तालुक्याचे लोकप्रतिनिधी वेगळ्या पक्षाचे आहेत.
सांगोला सुतगिरणी निवडणूकी नंतर तालुक्यात, नव्हे तर राज्यात अव्वलस्थानी असलेल्या संघाचीही निवडणूक बिनविरोध झाल्याने शेकापच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
