सांगोला आगाराला ४८ लाखांचा फटका
सोमवारी एकही गाडी आगारातून बाहेर पडली नाही
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
संपूर्ण राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून,सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सांगोला आगारातून एकही गाडी बाहेर पडली नाही, त्यामुळे ऐन दिवाळीत सांगोला आगाराचे ४८ लाख रुपयाचे उत्पन्न बुडाले आहे.
राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये सामावून घ्या म्हणून कामबंद आंदोलन सुरू केले आहे, राज्यभरातील २३५ डेपो बंदच आहेत, ऐन दिपावलीत याचा मोठा फटाका बसलेला आहे, सांगोला आगारातून ही ऐन दीपावली सणात ही एसटी सेवा तुरळक अशीच सुरू होती, राज्य मार्गावर असलेल्या या आगाराला मोठा फटका बसलेला आहे, सोमवार ८ नोव्हेंबर रोजी आगारातून एकही गाडी बाहेर पडली नाही,आगारातील ५१ गाड्या जागेवरच थांबून होत्या,यामध्ये येथील २५३ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोदंविला आहे, दैंनदिन ६ लाख रुपांपर्यंतचे उत्पन्न धरले तर आगाराचे ४८ लाखाचे उत्पन्न बुडाले आहे.