ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमाध्यमविश्वराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी

सर्वांनी एकसंघ राहून सांगोला तालुका घडवूया : डॉ.अनिकेत देशमुख

डॉ.अनिकेत देशमुख यांच्या गावभेट दौर्‍यास उत्स्फुर्त प्रतिसाद

Spread the love

सांगोला/ नाना हालंगडे
कोरोनाच्या महाभयंकर साथीमुळे गेली दोन वर्षे कार्यकर्त्यांशी आणि गावातील नागरिकांशी थेट सुसवांद साधता आला नाही ही माझ्या मनात खंत होती. त्यामुळे सर्वांशी सुसंवाद साधून अडचणी जाणून घेण्यासाठी व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी गावभेट दौरा आयोजीत केला आहे. स्व.आबासाहेबांमुळे शेतकरी कामगार पक्ष आजही मजबूत असून आजही एकसंघटित आहे याचा मला आनंद आहे. येणार्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षातील सर्वांनी एकसंघ राहून स्व.आबासाहेबांना अभिप्रेत असणारा सांगोला तालुका घडवुया असे प्रतिपादन शेकापचे युवा नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने काल मंगळवार दि.13 सप्टेंबर पासून गावभेट दौर्‍याचे आयोजन केले आहे. काल अकोला, वासुद, वाटंबरे, कमलापूर, य.मंगेवाडी, चिणके, वझरे, अजनाळे या गावात डॉ.अनिकेत देशमुख यांचा गावभेट दौरा संपन्न झाला. या गावभेट दौर्‍याप्रसंगी डॉ.अनिकेत देशमुख बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख, प्रा.विठ्ठलराव शिंदे सर, प्रा.कोळवले सर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, विविध गावचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह तरुण कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील बदाबदा मारायचे; शहाजीबापूंनी जागवल्या बालपणीच्या आठवणी

 

पुढे बोलताना डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, शेतकरी कामगार पक्ष वाढविण्यासाठी व लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव भेट दौरा आयोजीत केला आहे. शेकापमध्ये कोणत्याही प्रकारची गटातटाची बाजू नाही त्यामुळे इतर कोणीही कार्यकर्त्यांमध्ये दुभावना निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. येणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करुन शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा फडविण्यासाठी सज्ज व्हावे असे सांगत कार्यकर्त्यांकडून येणार्‍या सूचनांचा आदर करुन आवश्यक त्याठिकाणी आम्हीही बदल करु असे त्यांनी आश्वासन दिले.

भयानक! जत तालुक्यात चौघा साधूंना बेदम ठोकले

 

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा देशमुख म्हणाले, शेकाप हा कष्टकर्‍यांचा पक्ष आहे. शेकापने लोकशाहीची सवय लावली आहे त्यामुळे शेकाप हा नेहमी मजबूत राहणार आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी गाव भेट दौरा नियोजन केले असून देशमुख घराण्यात कोणत्याही प्रकारची दुफळी नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहून पक्ष मजबूत करुया असे आवाहन करत डॉ.बाबासाहेब आणि डॉ.अनिकेत तालुक्यातील जनतेसाठी एकत्र काम करतील, असेही शेवटी त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात प्रा.विठ्ठलराव शिंदे सर यांनी शेतकरी कामगार पक्षाची सद्य परिस्थिती, अडचणी, समस्या, कार्यकर्त्यांशी संवाद, हा गावबैठकीचा उद्देश असल्याचे सांगून सर्वांचे स्वागत केले. या बैठकीत प्रत्येक गावात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रत्येक गावातील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाहा खास व्हिडिओ

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका